तिरोडा शहरातील घरफोडीचा गुन्हे शाखेने केला उलगडा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

तिरोडा शहरात एकाच रात्री ४ दुकाने फोडणारी टोळी गजाआड  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४ गुन्हेगारांना नागपुर येथुन तर एकास तिरोडा येथुन जेरबंद करून ठोकल्या बेडया मुद्येमाल हस्तगत….

गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की अशी , दि(१७) चे रात्री ९.३० वा तें दि.(१८) चे  दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी  गंज बाजार तिरोडा येथील ४ ते ५ दुकानांचे शटर तोडून किराणा दुकान, मेडीकल दुकानातील गल्यातील चिल्लर व नगदी चोरून नेल्याने फिर्यादी श्री. संजय मेटवानी रा. कंवरराम वार्ड, तिरोडा यांचे तक्रारी वरून पो. ठाणे तिरोडा येथे अप.क्र. ३२०/२०२४ कलम ३८०, ४५७ भांदवि प्रमाणे दाखल करण्यात आला होता





तिरोडा शहरात एकाच रात्री चोरटयांनी ४ ते ५ दुकाने फोडल्याने शहरातील व्यापार वर्गात चोरटयांचे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तिरोडा शहरातील घडलेल्या चोरी प्रकरणाचे गांर्भीर्य लक्षात घेता पोलिस अधिक्षक निखील पिंगळे यांनी स्थानिक गुन्हे शाखा पथकास, तसेच पोलिस ठाणे तिरोडा पोलिसांना सदर गुन्हयातील चोरट्यांचा शोध घेवून गुन्हेगारांना जेरबंद करून गुन्हयात तात्काळ अटक करण्याबाबत निर्देशित केले होते.



या अनुषंगाने  वरिष्ठांचे  आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी,साहील झरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असतांना घटनास्थळ शेजारी तसेच तिरोडा शहरात लागलेले सीसीटिव्ही फुटेज ची तपासणी केली असता प्राप्त सीसीटिव्ही फुटेज आणि प्राप्त गोपनिय बातमीदार यांचे माहीती वरून सदर गुन्हयातील चोरटे यांनी एका काळया रंगाच्या मारूती अल्टो गाडीचा वापर केल्याचे दिसून आल्याने संदर संबंधात अधिक माहीती प्राप्त करून शोध केला असता सदरची गाडी ही भारत कंटेनर्स कंपनीचे युनीट १ चे गेट क्र.१ चे बाजुस नागपुर येथे उभी असल्याची माहीती प्राप्त झाल्याने पोलिस पथकाने पो. ठाणे हिंगणा एमआयडीसी नागपुर येथे जावून तेथील पोलीस स्टॉफ चे मदतीने सदर गुन्हयात वापरलेली गाडी क्र. एम.एच. ३१ सीएम-६४३२ ही भारत कंटेनर्स कंपनीचे युनीट १ चे गेट क्र.१ चे बाजुला उभी असल्याचे दिसुन आल्याने कंपनीचे वॉचमैन यांस गाडीबाबत सखोल विचारपुस केली असता सदर कंपनीत काम करणारे नमूद गाडीचे मालक आरोपी  १) रविकांत दयानंद गोंड वय ३७ वर्षे रा. प्लॅट न.९३ पी.एन. नायडू इंडस्ट्रियल एरीया नागलवाडी ता. हिंगणा नागपूर यांस ताब्यात घेवून तिरोडा येथे गुन्हयात त्याच्या गाडीचा झालेला वापर व गुन्हयासंबंधात सखोल विचारपुस केली असता सुरवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिली. विश्ववासात घेवून त्यास पुन्हा गुन्हयासंबंधाने विचारपुस चौकशी केली असता त्याने त्याचे मित्र सहकारी आरोपी २) महेश बालाराम दुरूगकर वय ४४ वर्षे रा. मुकेश किराणा जवळ निलडोह नागपुर ३) नागेश हिरामण तिजारे वय २३ वर्षे रा. अमरनगर, ता. हिंगणा, नागपूर,४) समीर प्रमोद गडपायले वय २४ वर्षे रा. वानाडोंगरी नागपूर असे मिळुन तिरोडा येथील त्यांचा मित्र आरोपी क्र ५) रियाज ऊर्फ राजा रमजान कुरेशी वय २४ वर्षे रा. नेहरू वार्ड तिरोडा व यातील फरार आरोपी क्र ६) सौरभ गजभिये रा.जुनी वस्ती तिरोडा* यांचे सांगणेप्रमाणे तिरोडा येथे चोरी करण्याचे ठरल्याचे व ठरल्याप्रमाणे तिरोडा येथे जावून दुकानाचे शटर तोडून चोरी केल्याचे यातील आरोपी क्र. १ ते ५ यांनी सांगुन कबुल केले आहे.



आरोपीतांचे ताब्यातून गुन्हयात वापरलेली मारूती अल्टो कंपनीचे चारचाकी वाहन, गुन्हयात चोरलेली रक्कम रूपये २९९०/-रूपये गुन्हयात हस्तगत करून जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपी क्र. १ ते ५ यांना गुन्हयात ताब्यात घेऊन तिरोडा पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. तसेच आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आलेली असुन पुढील कायदेशिर कारवाई तिरोडा पोलिस करीत आहेत.याच आरोपींनी काही दिवसा पूर्वी बालाघाट येथे सुद्धा अश्या प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे

सदरची कामगीरी पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक,नित्यांनद झा, यांचे निर्देशान्वये उपविभागीय पोलिस अधिकारी. तिरोडा साहिल झरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनांत पोउपनि महेश विघ्ने, पोलिस अंमलदार पोहवा सुजित हलमारे, इंद्रजित बिसेन, दुर्गेश तिवारी, पोशि संतोष केदार, चापोशि घनश्याम कुंभलवार स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!