खुन का बदला खुन,वडिलांचे खुनाचा बदला घेतला आणि..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

30 वर्षापूर्वी वडिलांचा खून केल्याचा राग मनात धरून लोखंडी रॉडने खून करणाऱ्यास साथीदारासह दोघांना अटक करण्यात आली असुन  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफिने केला याचा  उलगडा…..

गोंदिया – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी चे सायंकाळी 6 ते 6.30 वा दरम्यान फुलचुरटोला ते पिंडकेपार जाणाऱ्या रोडवर मोटार सायकलचा अपघात होवून मृतक  मोरेश्वर खोब्रागडे रा. चंद्रशेखर वॉर्ड, श्रीनगर, गोंदिया हे मयत झाल्याने पो. स्टे. गोंदिया ग्रामीण येथे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता,






सदर गुन्ह्याचे घटनास्थळास भेट दिल्यानंतर प्रथमदर्शी दिसुन आलेली मयताची स्थिती, परस्थितीजन्य , आणि घटनास्थळ वरील भौतिक दुवे, शेजारील सी. सी. टी. व्ही. फुटेज ची पाहणी यावरून सदरचा गुन्हा हा अपघात नसून खून असल्याचे दिसून येत असल्याने पोलिस अधीक्षक  निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी गुन्ह्यात खून प्रकरणाचे कलमवाढ करण्याचे निर्देश दिले होते. यावरून पो. स्टे. गोंदिया ग्रामीण येथे गुन्हा र. क्रं. 520/2023 कलम 302, 341, 34 अन्वये दाखल करण्यात आले होते..सदर खून प्रकरणाचा छडा लावून तपास करून सदर प्रकरणाची सत्यता पडताळून गुन्ह्याचा उलगडा करून गुन्हेगारांना तात्काळ जेरबंद करण्याच्या निर्देश सूचना पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया शहर, गोंदिया ग्रामीण, पोलिस निरीक्षक नक्षलसेल यांना दिलेल्या होत्या त्याअनुषंगाने नमूद गुन्ह्याचे तपासात वरिष्ठांचे प्राप्त आदेश व निर्देशांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळी 3 पथके तयार करण्यात आलेली होती तसेच गोंदीया शहर, गोंदिया ग्रामीण, नक्षल सेल येथील अधिकारी अंमलदार यांची वेगवेगळी पथके आरोपीचा शोध व सदर प्रकरणाचा उलगडा करण्याकरिता नेमण्यात आलेली होती



स्थानिक गुन्हे शाखेची पथके सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध व याबाबत अधिक माहिती घेत असताना पथकास गोपनीय सुत्राद्वारे माहिती प्राप्त झाली की, यातील मयत याने काही वर्षापुर्वी यातील आरोपी इसम  सुनील भोंगाडे याचे वडीलाचा खून केला होता व तो 8 दिवसापासून मयताचे मागावर होता अशा प्राप्त माहिती वरुन आणि करण्यात आलेल्या 100 ते 150 च्यावर सी. सी.टी.व्ही. फुटेज चे पडताळणी आणि तांत्रीक विश्लेषण अंती खात्री करून 1) सुनील भोंगाडे 2) शाहरुख शेख यांना गुन्ह्यांत ताब्यात करण्यात आले नमूद गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने विश्वासात घेवून विचारपूस केली असता आरोपी सुनील भोंगाडे याने सांगितले की, म्रुतक मोरेश्वर खोब्रागडे याने त्याचे भावासह मिळुन अंदाजे 30 वर्षापुर्वी त्याचे वडील  धनीराम भोंगाडे यांचा जमीनीचे वादावरुन मनोहर चौक गोंदिया येथे धारदार शस्त्राने वार करुन जिवानिशी ठार केले होते. तसेच अंदाजे 1 वर्षा पुर्वी पासुन कोणत्याही सामाजिक कार्यक्रमामध्ये म्रुतक  मोरेश्वर खोब्रागडे हा सुनील भोंगाडे यास पाहुन नेहमी डिवचण्याचे उददेशाने हसत असल्याचा राग मनात धरून म्रुतक यास जिवानिशी ठार मारण्याचे ठरविले होते यावरून *आरोपी नामे-*
*1) सुनील धनिराम भोंगाडे वय 44 वर्षे राहणार- शास्त्री वॉर्ड गोंदिया** याने त्याच्या दुकानात काम करणारा  साथीदार
*2) शाहरूख हमीद शेख वय 24 वर्षे रा. कु-हाडी* यांस सदर बाब सांगुन मयत यांस जिवानिशी ठार मारण्याचे ठरविले होते असे सांगून दिनांक 29-11-2023 रोजी मयताचे मागावर सायंकाळी 5 वाजेदरम्यान त्याचे कडील गाडीने पिंडकेपार रोडकडे जावून अनिल कबाडी यांचे गोडावुन लगत असलेल्या खुल्या जागेत म्रुतक- मोरेश्वर खोब्रागडे यास रोडवर गाडीने अडवून लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर पाच ते सहा वार केले. व शाहरुख याने त्यास लाथाबुक्याने डोक्यावर व पोटावर मारहाण केली व तेथुन पसार झाले असे सांगीतले यावरुन दोन्ही आरोपीतांना पो. स्टे. गोंदिया ग्रामीण गुन्हा र.क्रं. 520/2023 कलम 302, 341, 34 मध्ये अटक करण्यात आली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि.चव्हान, हे करीत आहेत



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे,अप्पर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक  दिनेश लबडे, स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांचे नेतृत्त्वात सपोनि विजय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, वनिता सायकर, सहाय्यक फौजदार अर्जुन कावळे, पोलिस हवालदार राजेंद्र मिश्रा, भुवनलाल देशमुख, महेश मेहर इंद्रजीत बिसेन,सोमेंद्रसिंग तुरकर, रियाज शेख तुलसिदास लुटे, नेवालाल भेलावे, चित्तरंजन कोडापे, सुजित हलमारे, संतोष केदार, अजय रहांगडाले, चालक लक्ष्मण बंजार, घनश्याम कुंभलवार, विनोद गौतम तसेच नक्षल सेल येथील आशिष वंजारी, सायबर सेल चे दीक्षित दमाहे, धनंजय शेंडे, संजय मारवाडे, सोनवणे, रहीले, येरने, यांनी अथक परिश्रम , प्रयत्नांनी कामगिरी बजावली आहे.

त्याचप्रमाणे नमूद गुन्ह्यांचा उलगडा करण्या करिता पोलिस निरीक्षक गोंदिया शहर  चंद्रकांत सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाने , पो. नि. गोंदिया ग्रामीण  चंद्रकांत काळे, यांचे मार्गदर्शनात ग्रामीण पोलिसांनी, तसेच पो. नि. नक्षल सेल. भुषण बुराडे यांचे पोलिस पथकाने अथक परिश्रम मेहनत घेतली आहे…





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!