
गोंदिया पोलिसांची कुख्यात गुंड अंकज राणे याचे टोळीवर मकोका अंतर्गत कार्यवाही…
पोलिस उप-महानिरीक्षक संदीप पाटील यांचे आदेशांन्वये पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांची मकोका अंतर्गत सन- 2023 मधील दुसरी दर्जेदार कारवाई,कुख्यात टोळी प्रमुख अंकज सोहनलाल राणे व त्याचे टोळीतील इतर 02 सदस्याविरूध्द मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई….
गोंदीया – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक, निखील पिंगळे, यांनी गोंदिया जिल्हयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर जिल्हयातील गुन्हेगारी पार्श्वभूमी, पुर्व इतिहास लक्षात घेवुन, जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकामी वाढती संघटीत गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्याकरीता, संपुर्ण गोंदिया जिल्हयातील संघटीतरित्या गंभीर गुन्हे करणारे गुन्हेगार यांचे विरुध्द कडक धोरण राबविण्याबाबत निर्देश दिलेले होते,


त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन रामनगर अंतर्गत दाखल गुन्हा क्र. 354/2023, कलम 302, 324, 323, 34 भादवी अंतर्गत गुन्हयातील संघटितरित्या गुन्हे करणारे आरोपी

1) अंकज सोहनलाल राणे वय 23 वर्षे राहणार सिविल लाईन गोंदिया

2) हर्ष उर्फ सोनू छवींद्र वाघमारे वय 20 वर्ष राहणार नारायण नगर गुरुदेव चौक गोंदिया
3) प्रवीण सुनील मुटकुरे वय 20 वर्षे राहणार- रेलटोली गोंदिया
यांनी नमूद गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली,सदर गुन्हयाचे तपासात असे निष्पन्न झाले कि, नमूद गुन्हेगार आरोपीतांनी संघटीतरित्या टोळी निर्माण करुन गोंदिया जिल्हयात त्यांची टोळी सक्रीय करुन जनसामान्यांच्या मनात भय व हिंसेचे वातावरण निर्माण केलेले आहे… त्यांचा अंतीम हेतु स्वतः करीता आर्थीक फायदा मिळविणे हेच आहे, यातील टोळी प्रमुख याने मागील 10 वर्षाचे काळात वेगवेगळ्या ईतर 13 साथीदारांचे मदतीने संघटितरित्या 5 गुन्हे केले आहेत. तर एकटयाने सुध्दा गुन्हे केले आहेत,त्यांचे टोळीने मागील 10 वर्षापासुन ते आज पावेतो संघटितरित्या गुन्हयाची मालीका केलेली आहे, या टोळी विरुध्द इतराचे जिवीतास किंवा वैयक्तीक सुरक्षिततेस धोक्यात आणणारी कृती करणेे, ईच्छापुर्वक दुखापत करणे, आपखुसीने दुखापत करणे, हमला करणे किंवा, खंडणी वसुल करणे, खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे, ईत्यादी विविध शिर्षकाखाली गंभीर गुन्हे केलेले असुन टोळीची दहशत राहावी म्हणुन हत्यार जवळ बाळगुन नागरीकांमध्ये दहशत माजविने अशी कृत्य केली असुन त्यांचे टोळी विरुध्द गुन्हयांची विविध गुन्ह्यांची नोंद आहे गैरकृत्याव्दारे मिळणारे पैशांवर नमूद गुन्हेगार हे एैश आरामाचे, आणि चैनिचे जिवन जगत आहे
सदर आरोपीतांच्या गुन्हेगारी वृत्तीची सखोल माहिती घेवुन वेळीच दखल घेत पोलिस अधिक्षक, निखील पिंगळे, यांनी स्थानीक गुन्हे शाखा गोंदिया व पोलिस स्टेशन रामनगर यांना सदर संघटीत टोळीविरुध्द मकोका (MCOCA) कायद्याअंतर्गत कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते..यावरून पोलिस स्टेशन रामनगर व स्थानीक गुन्हे शाखा गोंदिया यांनी सदर गुन्हयातील नमूद तिन्ही आरोपीविरुध्द मकोका (MCOCA) कायद्या अंतर्गत प्रस्ताव तयार करुन सदरचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक गोंदिया पोलीस उप- महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र, कॅम्प नागपूर यांना दिनांक 8-12- 2023 रोजी मंजुरीस्तव सादर केले होते .दिनांक 13/12/2023 रोजी पोलिस उप महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र कॅम्प नागपूर यांनी पोलिस स्टेशन रामनगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर – *354/ 2023, कलम 302, 324, 323, 34* भादवि या गुन्हयातील-
टोळी प्रमुख 1) अंकज सोहनलाल राणे वय 23 वर्षे राहणार सिविल लाईन गोंदिया
*टोळी सदस्य
2) हर्ष उर्फ सोनू छवींद्र वाघमारे वय 20 वर्ष राहणार नारायण नगर गुरुदेव चौक गोंदिया
3) प्रवीण सुनील मुटकुरे वय 20 वर्षे राहणार- रेलटोली गोंदिया.
यांचेविरुध्द मकोका (MCOCA) कायद्याअतर्गत कलमवाढ करुन पुढील तपास करण्याचे आदेश पारीत केलेले आहेत.,सदर गुन्हयाचा तपास श्री. सुनिल ताजने, उपविभागीय पोलीस अधीकारी गोंदिया हे करीत आहेत.
पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मकोका (MCOCA) अंतर्गत केलेल्या कारवाईमुळे जिल्हयात संघटीतरित्या गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांच्या मनात दहशत निर्माण झाली असुन यापुढेही संघटीतरित्या गुन्हे करणाऱ्या विरुद्ध मकोका (MCOCA) कायद्या अंतर्गत कारवाई केली जाणार आहे..त्यामुळे संघटितरीत्या गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची यापुढेही खैर नाही
सदरची मकोका कारवाई (MCOCA) पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक,नित्यानंद झा, यांचे मार्गदर्शनाखाली नमूद गुन्ह्याचे तपासी अधिकारी सुनिल ताजने, उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग गोंदिया, यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनात दिनेश लबडे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस निरीक्षक केंजळे, स. फौ. राजू भगत, पो.हवा जनबंधू पो.स्टे. रामनगर, पोलिस उपनिरीक्षक वनिता सायकर, पो.हवा. चेतन पटले, प्रकाश गायधने, स्था.गु.शा. गोंदिया व उपविभागीय पोलिस अधिकारी, कार्यालय गोंदिया येथील पो.हवा. खेमराज बोधनकर, दुर्गप्रसाद कनोजे यांनी कारवाई पार पाडली आहे….


