
गोंदिया पोलिसांनी केली कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश जनावरांची सुटका
*पोलिस ठाणे चिचगड पोलिसांची कारवाई :- निर्दयतेने बंधिस्त केलेल्या कत्तलीसाठी जाणाऱ्या 67 गोवंशीय जनावरांची सुटका. किंमती एकुण 31, लाख 2000/- रुपयाचा मुददेमाल जप्त*
चिचगड(गोंदिया)- सवीस्तर व्रुत्त असे की आगामी कालावधीत येणाऱ्या सनांच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, यांचे निर्देश, सूचनाप्रमाणे आणि संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंदयाविरुध्द धाड मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार पोलिस . ठाणे चिचगड पोलिसांची अवैध धंदयाविरुध्द विशेष धाड मोहिम सुरु केली होती त्याचाच एक भाग म्हनुन दिनांक 03/09/ 2023 रोजी सहा.पोलिस निरीक्षक शरद पाटील, ठाणेदार चिचगड यांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे चिचगड पोलिसांनी गस्तीदरम्यान अवैध जनावरें वाहतूक संदर्भात कारवाई केली असता मौजा- गडेगाव (कोसबी) ते मेहताखेडा जंगल परिसरातून गडेगाव रस्त्यावर 2 ट्रक (आयचर) क्र.CG- 07 CG-8676, व CG-08 Z-8752 हे छत्तीसगढ़ कडून देवरी हायवे कडे जातांना दिसून आल्याने दोन्ही ट्रकला पाठलाग करून पकडले. यावेळी ट्रक क् :CG-07 CG-8676 ट्रकचे ड्रायव्हर जंगलाचा फायदा घेऊन जंगलात पळून गेला. सदर दोन्ही ट्रकचे मागील डाल्याची पाहणी केली असता ट्रक मध्ये डाल्यात लहान- मोठे गोवंश जातीचे एकूण 67 जनावरे दोरीने दाटी वाटीने बांधुन डांबून ठेवून सदर जनावरांना कोणत्याच प्रकारचे चा-या पाण्याची सोय न करता निर्दयतेने बांधुन ठेवलेले मिळुन आले. गोवंश जातीचे 67 जनावरे कि. अं. 4 लाख 2000 हजार /- रु व 2 ट्रक (आयसर) कि. अं. 27 लाख /-रु असा एकुण 31 लाख 2000 हजार /- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पो.ठाणे चिचगड येथे सदर दोन्ही व एक फरार इसमाविरुध्द कलम 11 (1) (ड) महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1960, सहकलम 5 (अ) 6,9 (अ) महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 सहकलम 119 महा. पो. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पो.हवा.नायमुतिॅ हे करित आहेत.सदर गुन्हयात जप्त गोवंश जातीचे जनावरांना त्यांचे सुरक्षेच्या दृष्टीने गौशालेत दाखल करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उप- विभागिय पोलिस अधिकारी देवरी, संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार चिचगड सहा. पो. निरीक्षक शरद पाटील पो.उपनिरीक्षक.जेनसिंग सोंजाल,पो.हवा. नायमुतिॅ, पो.ना. कमलेश शहारे. अमित मेंढे, संदीप तांदळे, पो.स्टे. चिचगड यांनी सदरची कामगिरी बजावली आहे.




