पोलिस अधिक्षक श्री निखिल पिंगळे यांचे संकल्पनेतुन व दादालोरा खिडकी योजने अंतर्गत महा आरोग्य रोगनिदान शिबीराचे आयोजन…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गोंदिया –  “आरोग्यम धनसंपदा” या वाक्याप्रमाणे  प्रत्येक माणसांनी आपले आरोग्य हे जपायला पाहीजे या भावनेतुन आपनही समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हनुन पोलिस अधिक्षक यांचे संकल्पनेतुन नानाविविध उपक्रम राबविले गेले त्यानुसारच दि २१ रोजी महाआरोग्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

तसा गोंदिया जिल्हा हा नक्षल प्रभावित जिल्हा असुन गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे जिल्हयातील जनतेच्या हिताकरीता विशेषतः नक्षलग्रस्त भागातील जनतेच्या कल्याणा करीता कायम अग्रेसर राहुन विविध कल्याणकारी नाविण्यपूर्ण उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येत असतात., त्याचाच एक भाग म्हणुन  निखिल पिंगळे पोलिस अधीक्षक गोंदिया यांच्या संकल्पनेतुन आणि . अशोक बनकर, अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया (कॅम्प देवरी) यांच्या मार्गदर्शनाखाली नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्हयातील दुर्गम, अति- दुर्गम भागातील गोर-गरीब तसेच आदिवासी बांधवांचे आरोग्य निरोगी राहावे याद्रुष्टीने गोंदिया जिल्हा पोलिस दल, रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ ईस्ट, सह आयोजक शालिनी ताई मेघे हॉस्पीटल व रिसर्च सेंटर, वानाडोंगरी नागपूर, अविघ्ना मुंबई, जीवन आधार सामाजिक संस्था तसेच माऊली मित्र मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक-21 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 09.00 वा ते दुपारी 03.00 वा. दरम्यान पर्यंत निःशुल्क महाआरोग्य रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते…





सदर आयोजित निःशुल्क आरोग्य रोग निदान शिबीरामध्ये शालिनीताई मेघे हॉस्पीटल व रिसर्च सेंटर वानाडोंगरी, नागपूर येथील स्त्री रोग, अस्थिरोग, नेत्ररोग, बालरोग, दंतरोग, शल्यचिकीत्सक, कान- नाक- घसा, न्युरो सर्जन, किडनी रोग तज्ञ, हृदयरोग तज्ञ, इ. आजारांचे तज्ञ वैद्यकिय चमु उपस्थित होती,सदर आयोजित निःशुल्क महाआरोग्य रोगनिदान शिबिर कार्यक्रमास उपस्थिती सर्व मान्यवर अतिथी, प्रमुख पाहुणे…त्यात प्रामुख्याने पोलिस अधीक्षक  निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर,, रोटरी क्लब साऊथ ईस्ट नागपूर चे प्रेसीडेंट -१) श्री. राजीव वरभे सर, २) माऊली सेवा मित्र मंडळ चे अध्यक्ष श्री. सुहास खरे३) शालीनीताई मेघे हॉस्पीटल नागपूर चे अॅडमिनीस्ट्रेटीव्ह ऑफीसर डॉ. अश्वीन ४) जिवन आधार बहुद्देशीय संस्था चे अध्यक्ष श्री. जिवन जवंजाळ  ५) मनोहरभाई पटेल महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेज देवरी चे मुख्याध्यापक श्री. जी. एम. मेश्राम सर ….यांचे सर्वप्रथम पुष्पगुच्छ देवून स्वागत सत्कार करण्यात आले.व आरोग्य रोगनिदान तपासणी शिबिर कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.आरोग्य रोगनिदान शिबिरात अतिदुर्गम आदिवासी नक्षल प्रभावित भागातील सहभागी झालेल्या नागरिकांची डॉक्टरांकडून निःशुल्क मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे औषधांचे वाटप करण्यात आले आहे.तसेच बी.पी. शुगर व इतर तपासण्या सुध्दा करण्यात आलेल्या आहेत.सदर शिबीरामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने ज्या पेशंटला अधिक उपचारा करीता रेफर करण्याची गरज भासत होती अश्या पेशंटला नागपूर डॉ.शालीनीताई मेघे हॉस्पीटल नागपूर व रोटरी क्लब साईथ ईस्ट नागपूर येथील अॅम्बुलन्स द्वारे नागपूर येथे पाठविण्यात आले असून.त्याच्यावर तेथे  मोफत उपचार करण्यात येणार आहे सदर शिबिरात जिल्ह्यातील 1107 नागरिकांनी ज्यात सालेकसा, देवरी, चिचगड, केशोरी, नवेगावबांध, अर्जुनी मोरगाव, अश्या नक्षलग्रस्त प्रभावित भागातील, तसेच तिरोडा, दवनीवाडा, गंगाझरी, गोरेगाँव, आमगाव, गोंदिया ग्रामीण, गोंदिया शहर, रावणवाडी परिसरातील जनतेने, नागरिकांनी मोठ्या उत्साहाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सहभागी होवून आरोग्य रोगनिदान शिबिराचा लाभ घेतला. यापैकी मोठे व्याधी असलेले 290 रुग्नांना ला पुढील उपचाराकरिता नागपूर येथे स्थलांतरीत आले आहे. सर्व सहभागी झालेल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे जेवणाची सुध्दा सोय करण्यात आलेली होती



रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ ईस्ट, शालीनीताई मेघे हॉस्पीटल नागपूर, माऊली सेवा मित्र मंडळ नागपुर यांचे गोंदिया जिल्हा पोलीस दलास नेहमी सहकार्य मिळत असते. त्यांच्या समन्वयाने गोंदिया जिल्हयात पोलिस दादालोरा खिडकी अंतर्गत कित्येक आरोग्य शिबीर राबविण्यात आलेले आहेत. विशेषतः सन 2022-2023 मध्ये सर्व सशस्त्र दुरक्षेत्र हद्दीत ऑपरेशन रोशनी अंतर्गत मोतीबिंदु निदान व शस्त्रक्रिया शिबीर राबविण्यात आलेले आहेत….. ज्यामध्ये 2500 चे वर पेशंट नी शिबीराचा लाभ घेतला असुन 150 पेक्षा जास्त नागरीकांची मोतीबिंदु ची मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे.



सदरचे महाआरोग्य रोगनिदान शिबिर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तसेच सर्व उपस्थितांचे आभार पोलिस निरीक्षक भुषण बुराडे यांनी केले.सदरचे शिबिर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नक्षल सेल गोंदिया येथील तसेच देवरी येथील अधिकारी अंमलदार, पो.नि.  भुषण बुराडे, सपोनि. नाईक, करंबळकर, पो.उप.नि. हत्तिमारे, मार्टिन, सूर्यवशी, साखरवाडे, एम.टी.ओ.आसकर, सुपरवाझर श्री. कटरे, बिनतारी संदेश विभागाचे श्री. कपिल जाधव यांनी अथक परिश्रम करून मेहनत घेतले





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!