
गणेशोत्सव व ईद सणाच्या पार्श्वभुमीवर गोंदिया पोलिस दलातर्फे शहरात पथसंचलन तसेच पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दंगा काबु प्रात्यक्षिक व सराव घेण्यात आला…
गोंदिया – जिल्ह्यात भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा पोलिसांनी उद्भवलेली आपत्कालीन परिस्थिती कश्याप्रकारे हाताळावी, पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्यक्ष काय करावे, काय करू नये, कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, याकरीता उद्भवलेली आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. आणि त्यासाठीच पोलिस मुख्यालय, कारंजा गोंदिया येथील कवायत मैदानावर *”दंगा काबू नियंत्रण रंगीत तालीम सराव”* पोलिस अधीक्षक, निखिल पिंगळे, यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत, नियंत्रणात व मार्गदर्शनात घेण्यात आले. दंगा काबू करण्याची रंगीत तालीम घेण्याविषयी पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, यांनी वेगवेगळ्या उदाहरणे देत मार्गदर्शन केले. ऐनवेळी उदभवलेल्या हिंसक परिस्थीतीला काबुत ठेवण्यासाठी आंदोलने, मोर्चे तसेच कोणत्याही अनुचित प्रसंगी उदभवलेल्या हिंसक जमावाला काबुत कसे करावे याकरिता राखिव पोलिस निरीक्षक. रमेश चाकाटे, आणि पोलिस मुख्यालय येथील कवायत निर्देशक, दंगा काबू पथकाद्वारे प्रात्यक्षिके सादर करून प्रशिक्षण देण्यात आले.
दंगल काबू योजने च्या रंगीत तालीम प्रशिक्षण दरम्यान एका संघटनेच्या वतीने प्रतिकात्मक मोर्चा काढून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उदभवलेल्या परिस्थीती वर काबू करण्याकरिता पोलीस बळाचा वापर करतांना लाठी, गॅस गन, ग्रिनेड, गोळीबार चा वापर कश्याप्रकारे करावे याचे उत्तम सादरीकरण रंगीत तालीम प्रशिक्षण दरम्यान जिल्हा पोलिसांना देण्यात आले.


➖ दंगा काबू नियंत्रण सरावची रंगीत तालीम पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, यांचे नेतृत्वात आणि प्रत्यक्ष मार्गदर्शनात पार पडली. यावेळी प्रामुख्याने प्रभारी पोलिस उपअधीक्षक (मुख्या.), श्रीमती नंदिनी. चानपूरकर, पोलिस निरीक्षक .दिनेश लबडे, यांचे देखरेखीखाली, जिल्ह्यातील सर्व उपविभागातील स्ट्रायकिंग फोर्स, पोलिस स्टेशन व ,कार्यालयातील रिझर्व्ह फोर्स, सी 60 पथके, आर.सी.पी पथके, राज्य राखीव पोलिस बल, सर्व 16 पोलीस ठाण्यातील अधिकारी अंमलदार असे एकुण साधारण 40 पोलीस अधिकारी, 250 पोलीस अंमलदार यांनी रंगीत तालीम प्रशिक्षणमध्ये सहभाग घेतला होता

➖ त्याचप्रमाणे गणेशोत्सव, आणि ईद सणाच्या पार्श्वभूमीवर उत्सवा दरम्यान जिल्ह्यात कायदा- सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा, जिल्ह्यातील सर्व जनतेने भयमुक्त, सौहार्दपूर्ण वातावरणात अतिशय उत्साहात सन उत्सव साजरे करावेत याकरिता गोंदिया शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून ते जयस्तंभ चौक – गांधी प्रतिमा -भवानी चौक – दुर्गा चौक- सराफा मार्केट- गोरेलाल चौक ते नेहरू पुतळा अशाप्रकारे जिल्हा पोलिसांचे रूट मार्च पथसंचलन घेण्यात आले. याद्वारे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या, कायदा सुव्यवस्था बिघडवू पाहणाऱ्या गुन्हेगारांवर वचक राहावा याकरिता शक्ती प्रदर्शन करण्यात आले आणि सरतेशेवटी प्रशासकीय इमारत, जयस्तंभ चौक गोंदिया, येथे पथसंचलनाची सांगता करण्यात आली.



