
गोंदिया पोलिसांनी सात सराईत गु्न्हेगारांवर केली तडीपारीची कार्यवाही…
गोंदिया- याबाबत थोडक्यात हकिगत अशी की, गोंदिया जिल्ह्यातील पोलिस ठाणे गोंदिया शहर हद्दीत राहणारे *सराईत गुन्हेगार टोळी प्रमुख
*कुणाल उर्फ शुभम देवराज महावत वय 28 वर्ष


त्याच्या टोळी विरुद्ध पोलिस ठाणे गोंदिया शहर, रामनगर येथे *अपहरण करून खून करणे* , *खुनाचा प्रयत्न करणे, घातक शस्त्र* *बाळगणे, जुगार खेळणे, दरोडा घालने,* *चोरी करणे, बेकादेशीर जमाव करणे, अशा गंभीर स्वरूपाचे* गुन्हे नोंद असून साथीदारासह टोळी करून गुन्हे दाखल आहेत. हे सर्व सराईत गुन्हेगार सवयीचे मगरुर, धाडसी, व धोकादायक प्रवृत्तीचे आहेत. यांच्या सर्वांच्या बेकायदेशीर वागण्यामुळे, वाईट कृत्यामुळे गोंदिया शहर रामनगर, परीसरातील सर्वसामान्य नागरिकांचे मनात दहशत निर्माण झालेली असून लोकांचे सार्वजनिक स्वास्थ्यास जीवितास, व मालमत्तेस, धोका निर्माण झाला असल्याने सर्वसामान्य व्यक्ती त्यांचेविरुद्ध उघड साक्ष देण्यास पुढे येत नाहीत. पोलिसांनी त्याचेविरुद्ध वारंवार कारवाई करून सुध्दा त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. सदर गुन्हेगारांच्या वाईट कृत्यांमुळे परीसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याने त्यांचेविरूद्ध पोलिस निरीक्षक, पोलिस ठाणे रामनगर संदेश केंजळे, यांनी त्यांना गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार/तडीपार करणे करीता कलम 55 महाराष्ट्र पोलिस अधिनियम अन्वये प्रस्ताव तयार करून उपविभागीय पोलिस अधिकारी, गोंदिया यांचे मार्फतीने मंजुरीस्तव सादर केलेला होता. सुनील ताजने, उपविभागीय पोलिस अधिकारी, गोंदिया यांनी विहीत मुदतीत सदर हद्दपार प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून सदर गुन्हेगार टोळीस गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याची शिफारस हद्दपार प्राधिकारी तथा पोलिस अधीक्षक, गोंदिया यांना केली होती. या अनुषंगाने हद्दपार प्राधिकारी तथा पोलिस अधीक्षक, गोंदिया यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 कलम 55 अन्वये अपहरण करून खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, घातक शस्त्र बाळगणे, जुगार खेळणे, दरोडा घालने,चोरी करणे , बेकादेशीर जमाव करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असलेल्या व टोळी करून गुन्हे करणाऱ्या टोळीतील लोकांकडून आगामी सण ,उत्सव, निवडणूक काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना उपद्रव होऊ नये याकरिता सदर टोळीतील *गोंदिया शहर, रामनगर* हद्दीत भय व हिंसा निर्माण करणारा *टोळी प्रमुख *

सराईत गुन्हेगार
*1) कुणाल उर्फ शुभम देवराज महावत वय 28 वर्ष*
टोळीतील सदस्य नामे –*
2) गौतम उर्फ गामा संजय वाहने वय 28 वर्ष

3) संग्राम प्यारेलाल महावत वय 25 वर्ष राहणार- कुंभारटोली, बाजपेई वार्ड, गोंदिया
4) सनी प्रदीप जनवारे वय 26 वर्ष
5) निलेश गोरिलाल महावत वय 23 वर्ष
6) अमित मनोहर बघेल वय 25 वर्ष
7) राहुल उर्फ कालू चमन चित्रे वय 24 वर्ष राहणार सावराटोली, सुभाष वार्ड, गोंदिया
या सर्वांना हद्दपार आदेशाची बजावणी करून गोंदिया जिल्ह्यातून 02 महिन्यांकरिता हद्दपार /तडीपार करण्यात आले आहे. सदरचे हद्दपार इसमांपैकी 04 नागपूर, 01 चंद्रपूर व 02 छत्तीसगड येथे निघून गेले आहेत. सदर गुन्हेगारांना विना परवाना गोंदिया जिल्ह्यात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे.
पोलिस अधीक्षक, .निखिल पिंगळे यांनी केलेल्या हद्दपार/ तडीपारीच्या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सराईत धोकादायक असनाऱ्या अवैध कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. यापूर्वी सुध्दा पोलिस अधीक्षक, गोंदिया यांनी तिरोडा परिसरात टोळी करून अवैध धंदे करणाऱ्या 6 सराईत धोकादायक गुन्हेगारांना गोंदिया जिल्ह्यातून दोन महिण्याकरिता तडीपार केले आहे. यापुढेही पोलिस अधीक्षक गोंदिया, यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात टोळी करुन अवैध कृत्य करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना हद्दपार/तडीपार करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.गोंदिया जिल्ह्यातील शहरी / ग्रामीण भागांतील जनतेने विशेषतः गोंदिया शहर, रामनगर हद्दीतील नागरिकांनी आगामी काळात साजरे करण्यात येणारे सण उत्सव काळ लक्षात घेता सराईत गुन्हेगाराविरूद्ध केलेल्या हद्दपार कारवाईचे स्वागत केले असून समाधान व्यक्त केले आहे.
सदरची कारवाई निखिल पिंगळे, पोलीस अधिक्षक, .अशोक बनकर, अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी, सुनील ताजने, उपविभागीय पोलिस अधिकारी, गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे रामनगरचे पो.नि.संदेश केंजळे, यांचे मार्गदर्शनात पो.हवा. टेंभुर्णीकर, जनबंधू यांनी तर स्थानीक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात *प्रतिबंधक सेल, स्थागुशाचे* मपोउपनि- वनिता सायकर, पो.हवा. चेतन पटले, यांनी कामगिरी केलेली आहे .
अवैध बेकायदेशीर कृत्य करून दहशत निर्माण करून साथीदारांसह टोळी करून अवैध कृत्य करणा-या गुन्हेगारांनी आपल्या अवैध कृत्यापासून परावृत्त होवून ईतर रोजगाराकडे वळण्याचे आवाहन गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात येत आहे.


