
तु मला धक्का का मारला,शुल्लक कारणावरुन गोंदियात एकाचा खुन….
गोंदिया(प्रतिनिधी)- दिवाळीच्या शुभ रात्री गोंदीयातुन एक
धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. तरुणाच्या मानेवर व पोटात चाकूनं वार करत त्याची हत्या करण्यात आली आहे. अर्पित उके उर्फ बाबु वय २३ रा अंबाडोली गोंदीया असं या तरुणाचं नाव असल्याची माहिती समोर येत आहे. त्याची हत्या का झाली? तुर्तास तु मला धक्का का मारला या शुल्लक कारणांमुळे वाद झाल्याचे म्रुतकचा सोबत असलेला व जखमी राहुल दहाट यांचे म्हणने आहे परंतु खुन कशामुळे झाला याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये. दरम्यान तरुणाचा खून झाल्याची घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात पुढील तपास पोलिस स्टेशन रामनगरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजले हे करी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेबाबत सवीस्तर माहिती अशी की, ऐन सणाच्या दिवशीच गोंदियात तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणानं खळबळ उडाली आहे. अर्पित उके उर्फ बाबू असं या तरुणाचं नाव असल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्यावर चाकूनं वार करत त्याची हत्या करण्यात आली. व त्याच्या सोबत असनारा त्याचा मित्र राहुल डहाट यालाही मानेवर फरशी मारुन जखमी केल परंतु हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.गोंदिया येथील रामनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रेल टोली परिसरातील गुजराती शाळेसमोर चाकूनं वार करत या तरुणाची हत्या करण्यात आली. रात्री गोंदिया शहरात दिवाळी निमित्त अनेक जण आपल्या कुटुंबासोबत रात्री उशिरापर्यंत रांगेळी पाहण्यासाठी शहरात फिरत असतानाच ही घटना घडली आहे. हत्येची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंदिया जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.




