
सालेकसा पोलिसांची अवैध धंदे विरोधात धडक मोहीम,अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले….
सालेकसा(गोंदिया) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधिक्षक आणि अपर पोलिस अधीक्षक, यांनी मध्यप्रदेश व छत्तीसगढ राज्यातील आगामी विधानसभा निवडणुक- 2023 च्या अनुषंगाने जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये, कायदा सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी. जिल्हयात अवैध धंदे व गुन्हे प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावी करण्यासाठी आपरेशन क्रॅकडाऊन मोहीम राबविण्यात यावी असे सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना आदेश निर्देश सूचना दिलेल्या आहेत.
या अनुषंगाने जिल्ह्यात ऑपरेशन क्रॅक डाऊन मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. दिनांक- 7-11- 2023 रोजी पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, पोलिस स्टेशन सालेकसा यांचे मार्गदर्शनात अवैध धंदे करणाऱ्याविरुध्द पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त बातमीदाराचे माहीतीच्या आधारे मौजा- खुळसंग टोला येथील राहणारे सुजीत हरु कापसे वय 31 वर्ष* याचे घराचे बाथरूम ची पंचासमक्ष झडती घेतली असता बाथरुम मध्ये एका निळया रंगाच्या पॉलीथीन मध्ये एकुण 0.850 किलोग्रॅम वजनाचा हिरवट ओलसर उग्र वास येणारा अंमली पदार्थ गांजा किंमती अंदाजे 18,700/- रु. चा माल मिळुन आल्याने आरोपीविरुद्ध पो.स्टे. ला अप क्र.404/2023 कलम 8(क), 20(ब) एन. डी.पी.एस. कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे..


तसेच दुसरी कारवाई मौजा- बटटोला जंगल शिवारात आरोपी – *सुरेश शालीकराम मरसकोल्हे वय ३७ वर्ष रा. बटटोला ता. सालेकसा* जि. गोंदिया हा मोहफुलाची हातभट्टीची दारु गाळतांनी मिळुन आल्याने त्याचे ताब्यातून मोहफुलाची हातभट्टीची दारु व दारु गाळण्याचे साहीत्यासह एकुण-15,200/- रु. चा जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध पो.स्टे. ला अप क्र. 405/2023 कलम 65 (ई), 66(1)(ब)(क) (ड) (फ) म.दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वरील कामगिरी पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधिक्षक, अशोक बनकर, उप- विभागिय पोलिस अधिकारी, देवरी संकेत देवळेकर, यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सालेकसा पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे पोउपनि अजय पाटील, स.फौ.संजय चौबे, रामेश्वर राऊत, पो.शि. विकास वेदक, अजय इंगळे, जितेन्द्र पगरवार, मपोशि आरती आंबाडारे, यांनी कामगीरी केली आहे…



