
घरफोडी करणारा चोरटा अवघ्या काही तासातच जेरबंद
घरफोडी करणारा चोरटा अवघ्या काही तासातच जेरबंद
गोंदिया – भरदुपारी घरफोडी करून चोरी करणारा चोरटा चोवीस तासांच्या आत मुद्देमालासह पकडण्यात गोंदिया पोलिसांना यश आले आहे. वाढत्या चोरी आणि घरफोडीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग तिरोडा अतिरिक्त कार्यभार, उपविभाग गोंदिया प्रमोद मडामे, यांनी नमूद गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने नमूद गुन्ह्यातील आरोपीतांचा तात्काळ शोध घेवून गुन्हेगारांना जेरबंद करून गुन्हा उघड करण्याच्या निर्देश सूचना दिलेल्या होत्या. या वरिष्ठांच्या निर्देश सूचना आदेशाप्रमाणे पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणून आरोपीला मुद्देमालासह अटक केली आहे.


या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी प्रदीप कृष्णबिहारी मिश्रा, रा. बाजपेयी वार्ड, आंबेडकर हायस्कुलच्या पाठीमागे, गौतम नगर, गोंदिया हे दि.24 नोव्हेंबर चे दुपारी 03.30 वाजता पत्नीसह कार्यक्रमाकरीता बाहेरगावी गेले होते. कार्यक्रम आटोपून दि.29 नोव्हेंबर ला घरी परत आल्यावर फिर्यादी यांचे पत्नीने सांगीतले की, त्यांनी घरातील पहील्या माळ्यावरील बेडरुममध्ये कपाटातील डब्यामध्ये ठेवलेले दागिने ज्यात -1) एक सोन्याची चैन, 2) एक सोन्याची ओम लॉकेट असलेली चैन , 3) एक सोन्याचा हार (पांचाली) 4) 05 ग्रॅम वजनाच्या तीन अंगठ्या 5) एक सोन्याची नथ 6) एक जोडी चांदीची पायल असा एकुण 2 लाख 21 हजार 100/- रुपयांचा मुद्देमाल डब्यात दिसत नाही. ते दागिने दि.24नोव्हेंबर ते 29नोव्हेंबर च्या दरम्यान कोणितरी अज्ञात चोरट्यानी चोरुन नेल्याने फिर्यादीचे तक्रारी वरुन पोस्टे. गोंदिया शहर येथे दि.30नोव्हेंबर रोजी अप. क्रं. 759/2023 कलम 454, 457, 380 भा.दं. वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग तिरोडा अतिरिक्त कार्यभार, उपविभाग गोंदिया प्रमोद मडामे, यांनी नमूद गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने नमूद गुन्ह्यातील आरोपीतांचा तात्काळ शोध घेवून गुन्हेगारांना जेरबंद करून गुन्हा उघड करण्याच्या निर्देश सूचना दिलेल्या होत्या. वरिष्ठांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे पोस्टे. गोंदिया शहर चे पोनि.चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी – अंमलदार यांनी गुन्हा दाखल होताच घटनास्थळाला भेट देवून गुन्हेगारांची संपुर्ण माहिती काढून संशयित गुन्हेगारांची माहिती प्राप्त करून माहितीचे विश्लेषण करुन गोपनीय आणि तांत्रीक माहितीच्या आधारे अवघ्या काही तासातच घरफोडी करणारा गुन्हेगार -फरहान ईशाक कुरैशी (वय- 19 वर्षे), रा. गौतमनगर, गोंदिया जिल्हा- गोंदिया याला ताब्यात घेवुन जेरबंद केले. त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता त्याने त्याचा एक अल्पवयीन मित्रासोबत नमूद घरफोडी केल्याचे कबुल केल्याने त्यांचे जवळुन गुन्ह्यातील
1) एक सोन्याची चैन वजन अं.12 ग्रॅम किं.अं. 48,000/- 2) एक सोन्याचे ओम लॉकेट असलेली चैन वजन अं. 13 ग्रॅम किं.अं.52,000 /-
3) एक सोन्याचा हार (पांचाली) अं.वजन 10 ग्रॅम, किं. अं.40,000/- 4) प्रत्येकी 05 ग्रॅम वजनाच्या तिन अंगठ्या (एकुण अं.15 ग्रॅ.कि. अं.60,000/- 5) एक सोन्याची नथ वजन अं. 03 ग्रॅम किं.अं.12,00 0/- 6) एक जोडी चांदीची पायल वजन अं. 200 ग्रॅम किं.अं. 9,100 /- असा एकुण 2 लाख 21 हजार 100/- रुपयांचा चोरीस गेलेला संपुर्ण मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोनि. सागर पाटील, पोस्टे. गोंदिया शहर हे करीत आहेत.

अशा प्रकारे सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि. सागर पाटील, पोहवा. जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, कवलपाल भाटीया, दिपक रहांगडाले, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, मपोहवा. रिना चौव्हाण, पोशि. अशोक रहांगडाले, दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाने, कुणाल बारेवार यांनी केली आहे.


