सशस्त्र दरोडा टाकण्याचे तयारीत असलेले दरोडेखोर बसमत शहर पोलिसांचे ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

शहर पोलिस स्टेशन वसमत यांचे  सतर्कतेमुळे दरोडेखोरांचा दरोडयाचा डाव फसला, दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे साहीत्य, ०१ मोटार सायकल व ०१ मोबाईल असा एकुण ६० हजार रू. चा मुददेमाल जप्त…

बसमत(हिंगोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक हिंगोली जी. श्रीधर यांनी जिल्हयात चोरी, घरफोडी, दरोडा इ. गुन्हे घडु नये त्यावर नियंत्रण असावे म्हणुन सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नियमित तपासणी सोबतच सतर्क रात्रगस्त व पेट्रोलींग इ. बाबत हिंगोली पोलीसांकडून नियमित कार्यवाही केली जात आहे. त्याअनुषंगाने दिनांक- १८/०२/२०१४ रोजी मा. पोलिस अधीक्षक हिंगोली  जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनात पोलिस स्टेशन वसमत शहरचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम आणि त्यांचे पथक वसमत परीसरात पेट्रोलींग करीत असतांना पथकाला
माहीती मिळाली कि, दगडगाव रेल्वे पुल ते रोहन खानावळ वसमत येथे काही इसम संशयास्पदरित्या अंधारात दबा धरून व एखादा गंभीर मालाविरूध्दचा गुन्हा करण्याचे उददेशाने तेथे थांबले आहेत. अशा माहीतीवरून व सदर इसमांची हालचाल ही संशयास्पद वाटल्याने पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम  सदर ठिकाणी छापा टाकला असता पोलिसांना पाहुन अंधाराचा फायदा घेत ०१ इसम घटनास्थळावरून पळुन गेले. तर घटनास्थळी पोलिसांना ०५ इसम मिळुन आले. त्यांचे नाव
१) हिरासिंग मोहनसिंग बावरी वय २० वर्ष रा. समता कॉलनी, देऊळगाव राजा जि. बुलढाणा





२) दिपकसिंग रघुविरसिंग चव्हान



०३) बादलसिंग रंजितसिंग चव्हान



०४) सुदंरसिंग रंजितसिंग चव्हान

०५) जस्सुसिंग रघुविरसिंग चव्हान

सर्व रा. रेल्वे स्टेशन रोड जवळ वसमत ता. वसमत जि. हिंगोली नमुद आरोपींना ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचेकडे दरोडा टाकण्यासाठी वापरणारे हत्यार ज्यात लोखंडी तलवार ०१, कटावनी ०१ चाकु ०१ व लोखंडी रॉड ०१, दोरी आणि
०१ कोयता तसेच ०१ मोटार सायकल व जुना वापरता मोबाईल असा एकुण ६०,०००/- रू. चा मुददेमाल मिळुन आला.
पोलिस पथकाने सदरचे सर्व साहीत्य जप्त करून वर नमुद आरोपी व घटनास्थळावरून पळुन गेलेले त्यांचे साथिदार असे
०६ इसमांविरूध्द पोलीस स्टेशन वसमत शहर येथे कलम ३९९,४०२ भादवी सह कलम ४/२५ भारतीय हत्यार कायदा
अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास वसमत शहर पोलिस करीत आहेत.
सदरची कार्यवाही  पोलिस अधीक्षक हिंगोली जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपान शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम, पोउपनि सुरेश भोसले, सपोउपनि हकीम शेख, पोह गारोळे, पोना चव्हान, वडगावे, पतंगे, मपोशि चव्हान, पिठलेवाड यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!