हिंगोली पोलिसांनी १२ तासाचे आत अनोळखी म्रुतदेहाची ओळख पटवून,आरोपीस केली अटक…
अनोळखी मृतदेहाची ओळख पटवुन, अवघ्या 12 तासात लावला खुनाचा छड,स्थागुशा व पोलिस स्टेशन हिंगोली शहर यांची संयुक्त कार्यवाही…..
हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०९/०२/२०२४ रोजी पो.स्टे. हिंगोली शहर हद्दीत भोगाव पाटी परिसरात रोडलगत नाल्यामध्ये उजवा पाय कृत्रिम असलेल्या एका अनोळखी इसमाच्या डोक्यावर दगड घालुन चेहरा विद्रुप करून खुन केला आहे अशी माहिती मिळाल्यावरून पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सदर गुन्हा उघड करण्याबाबत सुचना दिल्या होत्या
त्यावरून, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय हिबारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि.विकास पाटील,नरेंद्र पाडाळकर यांनी पथकासह घटनास्थळ भेट देवून स्थानिक गुन्हे शाखेचे व पो.स्टे. हिंगोली शहर चे दोन वेगवेगळे पथक नेमुन सदर गुन्हा उघड करण्याबाबत सुचना दिल्या. त्याअनुषंगाने पोलिस पथकाने हिंगोली जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींची यादी प्राप्त करून तसेच सोशल मिडीयामार्फत संदेश देवुन अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. त्यावरून गोपनिय माहिती मिळाली की, मौजे केळी, ता. औंढा ना. येथील हनुमान प्रभाकर सांगळे, वय २५ वर्ष, रा. केळी, ता. औंढा ना. याचे शेजारी राहणारा मयत इसम नामे सुरेश नागु सांगळे याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे मयताची पत्नीने काही दिवसापुर्वी गळफास घेवुन आत्महत्या केली. त्यानंतर मयत सुरेश सांगळे व आरोपी हनुमान सांगळे यांच्यात नेहमी वादावादी होत होती. त्यावरून आरोपी हनुमान प्रभाकर सांगळे याने मयत सुरेश सांगळे यास हिंगोली येथे बोलावुन, दारू पाजवुन दि.०८/०२/२०२४ रोजी रात्री आठ वाजण्याचे सुमारास भोगाव पाटी परिसरात नेवुन नाल्यामध्ये लोटुन दगडाने ठेचुन खुन केला अशी माहिती मिळाल्यावरून पोलिस पथकाने तात्काळ आरोपीचा माग काढला असता आरोपी हा मोटार सायकलने भरधाव वेगाने परभणीकडे पळुन जात असल्याचे निष्पन्न होताच तात्काळ हटटा वे सपोनि गजानन बोराटे यांना नाकाबंदी करण्याच्या सुचना देवुन आरोपीस अत्यंत शिताफीने पोलिस पथकाने ताब्यात घेवुन कौशल्यपुर्वक विचारपुस केली असता आरोपीने वर नमुद केलेल्या हकिगत प्रमाणे गुन्हा केल्याची कबुली दिल्यावरून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय हिबारे, पोनि विकास पाटील स्थागुशा हिंगोली, पो.नि नरेंद्र पाडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गजानन बोराटे,. हटटा, सपोनि. शिवसांब घेवारे, स्थागुशा हिंगोली, सपोनि.गजानन मोरे, पो.स्टे. हिंगोली शहर, पोलिस अंमलदार संभाजी लकुळे, अशोक धामणे, राजु ठाकुर, नितीन गोरे, आकाश टापरे, आझम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, धनंजय क्षीरसागर, संतोष करे, गणेश लेकुळे, प्रशांत वाघमारे, तुषार ठाकरे यांच्या पथकाने केली आहे.