पोलिस अधिक्षक,हिंगोली यांची वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

मागील वर्षाच्या तुलनेत हिंगोली पोलिस दलाची अवैध धंदयाविरुदध व प्रतिबंधक कार्यवाहीत वाढ…

हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर माहीती अशी की,हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयाचा पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर अवैध धंदयाविरुदध व प्रतिबंधक स्वरूपाची मोठया प्रमाणात कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच जिल्हयातील मालाविरुदधच्या गुन्हयांना कठोरपणे आळा घालुन गुन्हे उघड होण्याचे प्रमाण सुदधा वाढले आहे. पोलिस प्रशासन सातत्याने अवैध धंद्यावर  कार्यवाही करीत आहे.





सन २०२२ चे तुलनेत सन २०२३ मध्ये जुगार चे केसेस २१५ ने अधिक आहेत. तसेच अवैध हत्यार कायदयान्वये १७७ केसेस अधिक करण्यात आल्या आहेत व अवैध वाळु वाहतुक संदर्भाने सुदधा गतवर्षीच्या तुलनेत १७ केसेस अधिक प्रमाणात करण्यात आले आहे. याप्रमाणे अवैध दारू विरुदध सुदधा मोठया प्रमाणात कार्यवाही करून वाहनासह लाखो रूपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.



तसेच सन २०२२ चे तुलनेत सन २०२३ मध्ये प्रतिबंधक कार्यवाहचे १) १०७ crpc + ४१२ २) ११० crpc + ४४५ ३) १०९ crpc + ३५ ४) MPDA + २५ ५) ५५ ते ५७ मपोका +०३ याप्रमाणे कार्यवाही मध्ये वाढ झालेली आहे.
त्याचप्रमाणे हिंगोली जिल्हा पोलिस घटकातर्फे जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याचे व गुन्हेगारीस प्रतिबंध करून गुन्हे उघड करण्याच्या कामाकाजासोबत वेळोवेळी अवैध धंदयावर मोठ्या प्रमाणात कार्यवाही करण्यात आली असुन यापुढे सुदधा हिंगोली जिल्हयात चालणा-या अवैध धंदयाचा शोध घेवुन कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!