अट्टल दुचाकी चोरट्यास १२ तासाचे आत घेतले ताब्यात…
अट्टल दुचाकी चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या बारा तासाचे आत केले जेरबंद…
बसमत(हिंगोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(7) रोजी पो. स्टे.हिंगोली शहर हद्दीत हळद मार्केट परिसरात फिर्यादी दीपक विजय शेळके राहणार घोटा देवी यांची होंडा शाईन मोटार सायकल चोरी संदर्भाने गुरन 298/24 कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल होता. मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड करण्यासंदर्भाने पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस विकास पाटील यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत होते.
त्याअनुषंगाने दि. ( 9) रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की हळद मार्केट परिसरातून होंडा शाईन मोटार सायकल चोरलेला आरोपी धम्मपाल शेषराव सोनुने वय 25 वर्षे राहणार सिद्धार्थ नगर हिंगोली हा मोटार सायकल चोरला असून तो सध्या सिद्धार्थ नगर परिसरात चोरीच्या मोटार सायकल विक्री करण्यासाठी फिरत आहे अशी माहिती मिळाल्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी धम्मपाल सोनवणे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता प्रथमतः आरोपीने मोटारसायकल वरील मूळ नंबर प्लेट काढल्यामुळे उडवा उडवी चे उत्तर देत होता, आरोपीस अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने हळद मार्केट परिसरातून दोन दिवसापूर्वी मोटरसायकल चोरल्याचे सांगितले व गुन्हा कबूल केला , त्यावरून पोलिस पथकाने चोरलेली मोटरसायकल एम एच 38 AB 8804 होंडा शाइन 50,000/- रु.चा मुद्देमाल जप्त करून आरोपी व मोटार सायकल पो.स्टे.हिंगोली शहर येथे हजर करुन गुन्हा उघड केला आहे.आरोपीकडून अधिक मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील स्थागुशा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार लिंबाजी वाव्हळे, किशोर सावंत, महादू शिंदे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.