
शेतकऱ्यांच्या म्हशी चोरणारे टोळीचा म्होरक्या एका संघटनेचा पदाधिकारी,४ आरोपी अटकेत सुत्रधार फरार….
शेतक-याच्या म्हशी चोरणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद….
हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील गंभीर गुन्हयांना आळा घालण्याचे आदेश दिल्याने, पोलिस निरीक्षक विकास पाटील, स्थागुशा हिंगोली यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. शिवसांब घेवारे यांचे पथकाने आपले गोपनीय माहितगार सतर्क करून, गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीती आधारे,स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने तब्बल 100 किलोमीटर रोडवरील 40 ते 50 सीसीटीव्ही फुटेज ची बारकाईने पाहणी केल्यानंतर आरोपी निष्पन्न करण्यात यश आले आहे त्यानुसार कळमनुरी शिवारात
नंदकुमार सोनटक्के यांचे शेतामधुन दोन जाफरा व मुरा जातीच्या काळ्या रंगाच्या म्हशी पिकअप वाहनामधुन चोरी करणारे ईसम


१) अल्ताफ खान गफार खान पठाण, वय १९ वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. इंदिरानगर, कळमनुरी,
२) वसीम अक्रम शेख हबीब, वय २३ वर्ष, व्यवसाय खाजगी ड्राईव्हर, रा. इंदिरानगर, कळमनुरी,

३) अजीम खान जरीब खान पठाण, वय २० वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. खाजा कॉलनी, कळमनुरी यांना ताब्यात घेवुन, त्यांनी सदरील म्हशी ह्या

४) उरूज खान युसुफ खान, रा. खाजा कॉलनी, कळमनुरी
.याचेसह त्याचे मोटार सायकल चोरी करण्यासाठी व रेकी करण्यासाठी वापरून म्हैस चोरी करून, टाटा एस चारचाकी पिकअपने पुर्णा येथे नेवुन चोरीच्या म्हशी खरेदी-विक्री करणारे इसम नामे
५) इमरान कुरेशी मकदुम कुरेशी,
६) मकदुम कुरेशी मो. इस्माईल कुरेशी, दोन्ही रा.कुरेशी मोहल्ला, पुर्णा, ता. पुर्णा, जि. परभणी
यांना विकल्याचे सांगीतले. चोरीच्या म्हशी विकुन मिळालेले पैसे व गुन्हयात वापरलेले वाहन असा एकुण रूपये ५,४५,०००/- चे मुद्देमालासह आरोपी
१) अल्ताफ खान गफार खान पठाण, वय १९ वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. इंदिरानगर, कळमनुरी,
२) वसीम अक्रम शेख हबीब, वय २३ वर्ष, व्यवसाय खाजगी
ड्राईव्हर, रा. इंदिरानगर, कळमनुरी,
३) अजीम खान जरीब खान पठाण, वय २० वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. खाजा कॉलनी, कळमनुरी यांना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पो.स्टे. कळमनुरी येथे हजर केले आहे व पुर्णा येथील चोर या
म्हशीचा व्यापार करणारे पिता-पुत्र नामे
५) इमरान कुरेशी मकदुम कुरेशी,
६) मकदुम कुरेशी मो. इस्माईल कुरेशी, दोन्ही रा. कुरेशी मोहल्ला, पुर्णा, ता. पुर्णा, जि. परभणी व रेखी करणारा इसम उरूज खान युसुफ खान, रा. खाजा कॉलनी, कळमनुरी हा फरार आहे.
कळमनुरी येथील चोरटे हे रोडलगत म्हशीचा आखाडा शोधायचे, आणि रेखी करून पिकप मध्ये म्हशी भरून पूर्णा येथील नगरसेवक पिता कुत्रा कडे विकायचे. पूर्णा येथील चोरीच्या म्हशी खरेदी करणारे प्रतिष्ठित नगरसेवक पिता पुत्र यास आरोपी बनवल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने शेतकऱ्यांचे पशुधन जनावरांची चोरी करणाऱ्यांच्या मुळावर घाव घातला आहे. त्यामुळे नक्कीच स्थानिक शेतकऱ्यांचे पशुधन चोरी होण्याच्या प्रकाराला आळा बसेल हे मात्र नक्की
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील, स्था. गु. शा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार राजु ठाकुर, नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांनी केली आहे.


