घरात घुसुन महीलेच्या अंगावरील दागिणे जबरीने चोरणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

घरात घुसुन महिलेच्या अंगावरील दागीने जबरीने चोरणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली ची उत्कृष्ट कार्यवाही  गुन्हा दाखल होण्यापुर्वीच गुन्हेगार ताब्यात,चोरटा हा सराईत असुन या पुर्वी सुध्दा अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत…..

हिंगोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयात मालाविरूध्दचे गुन्हयांना आळा घालण्याचे तसेच बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणा-यांविरुध्द प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने,  विकास पाटील, पोलिस निरीक्षक, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. शिवसांब घेवारे यांचे पथकाने आपले गोपनीय माहितगार सतर्क करून, मालाविरुध्दच्या गुन्हयाबाबत माहिती घेत होते.
गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, दि.६/१२/२३ रोजी इसम  नागोराव सुखदेव श्रीरामे, वय २६ वर्ष, रा. हनकदरी, ता. सेनगाव, जि. हिंगोली हा दि. ०६/१२/२०२३ रोजी कमलानगर
येथील एका महीलेच्या घरात घुसुन अंगावरील सोन्या चांदीचे दागीने जबरीने चोरून नेले आहे अशी माहिती मिळाल्यावरून स्थागुशा हिंगोली पथकाने सदर महिलेची भेट घेउन विचापुस केली असता घटने मध्ये सत्यता आढळुन आली, परंतु आरोपीने पिडीत महिलेस पोलिस मध्ये तकार दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादी महिलेने पो.स्टेला अदयाप गुन्हा दाखल केला नसल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी सदर महिलेला सुरक्षेबाबत विश्वास देउन पो.स्टे हिंगोली शहर येथे गुन्हा दाखल करण्यास सांगितले.





सदर प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपीची गोपनिय माहिती काढली असता सदर गुन्हा हा रेकॉर्ड वरिल गुन्हेगार  नागोराव सुखदेव
श्रीरामे वय २६ वर्ष रा. हनकदरी ता. सेनगाव जि. हिंगोली याने केल्याचे समजले. त्या वरून आरोपी  नागोराव श्रीरामे यास हिंगोली येथे लोखंडी तलवार सह ताब्यात घेवून त्याचेविरूध्द पो.स्टे. हिंगोली शहर गुरनं. ९५० / २०२३ कलम ४/२५ भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे नमूद आरोपीस विश्वासात घेवून पो.स्टे. हिंगोली शहर गुरनं. ९४९ / २०२३ कलम ३९४ भा.दं.वि. या गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने काही दिवसापूर्वी कमलानगर, हिंगोली येथे एका महिलेस तिचे राहते घरात घुसुन तिचे अंगावरील सोन्या-चांदिचे दागीने जबरीने चोरून नेले बाबत कबुली दिल्याने
त्याचेकडुन कानातल्या सोन्याच्या काडया, गळयातील सोन्याची पोत, हातातील चांदिचे काकणे, एक ॲन्ड्रॉईड मोबाईल असा जबरीने चोरून नेलेला एकुण ८६, ४४५/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर आरोपीवर यापूर्वी सुध्दा नर्सी हददीतील पहिनी व घोटा देवी येथील महिलांच्या अंगावरील दागीने जबरीने चोरल्या बाबत व घरफोडीचे तसेच मुलींना पोलीस भरतीचे आमीष दाखुन फसवणुक केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदरची कार्यवाही  पोलिस अधीक्षक हिंगोली  जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक हिंगोली श्रीमती अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक स्थागुशा  विकास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शिवसांब घेवारे,पोलिस अंमलदार राजुसिंग ठाकुर, नितीन गोरे, आकाश टापरे, आझम प्यारेवाले, नरेंद्र सावळे, प्रशांत वाघमारे, इरफान पठान यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!