
सोयाबीन चोरट्यांची टोळी हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
शेतक-यांचे सोयाबीन चोरी करणारे अट्ल गुन्हेगारांची टोळी
स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांचेकडुन जेरबंद, सोयाबीन चोरीचे तब्बल ०७ गुन्हे उघड ०५ आरोपी एकुण १,०५,०००/- रू चे मुद्देमालासह ताब्यात…..
हिंगोली(प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन कळमनुरी हद्दीत मागील काही महीण्यापासुन शेतक-यांच्या शेतातील सोयाबीन चोरीचे गुन्हे घडलेले होते. त्याबाबत संबंधीत शेतकरी यांचे तकारी वरून पोलीस स्टेशन कळमनुरी येथे अज्ञात आरोपी विरुद्ध चोरीचे गुन्हे दाखल आहे. सदरचे सोयाबीन चोरीचे गुन्हे उघड करून सदर गुन्हे करणारे टोळीला पकडण्यासाठी पोलिस अधीक्षक,हिंगोली जी श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश देवून मार्गदर्शन केले होते. पोलिस निरीक्षक .विकास
पाटील यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीचे सपोनि शिवसांब घेवारे आणि त्यांचे तपास पथकाने नमुद घटनास्थळी व परीसरात भेटी देवुन तंत्रशुध्द तपास पध्दती व गोपनीय बातमीदार यांचे मदतीने माहीती घेत सदरचे गुन्हे हे


१) युवराजसिंग देवासिंग बावरी, वय २० वर्ष,

२) अक्षय रमेश पवार, वय २० वर्ष,

३) प्रेमसिंग सतनामसिंग टाक,वय २० वर्ष,
४) राजेश उर्फ सोन्या बंडु झुंबडे, वय २० वर्ष, सर्व रा. इंदिरानगर, कळमनुरी व
५) कृष्णा भारत आसोले, वय २० वर्ष, रा. आसोलवाडी, ता. कळमनुरी
यांनी मिळुन केले बाबत तपास पथकाला माहीती मिळाली
वरून स्थागुशाच्या पथकाने नमुद आरोपींना सापळा रचुन शितीफीने ताब्यात घेवून त्यांचेकडे कसुन तपास केला असता
त्यांनी खालील प्रमाणे जिल्हयात विवीध पोलिस स्टेशन अंतर्गत मोटारपंप व स्टॅटर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
ते गुन्हे खालील प्रमाणे.
१) पो.स्टे. कळमनुरी गुरनं. ६४४ / २०२३ कलम ४५७, ३७९ भा.दं.वि.
१) पो.स्टे. कळमनुरी गुरनं. ६२४/२०२३ कलम ४५४, ३८० भा.दं.वि.
३) पो.स्टे. कळमनुरी गुरनं. ६८९ / २०२३ कलम ३७९ भा.दं.वि.
४) पो.स्टे. कळमनुरी गुरनं. ६९० / २०२३ कलम ३७९ भा.दं.वि.
५) पो.स्टे. कळमनुरी गुरनं.६९१ / २०२३ कलम ३७९ भा.दं.वि.
६) पो.स्टे. कळमनुरी गुरनं. ४८५ / २०२२ कलम ३७९ भा.दं.वि.
७) पो.स्टे. कळमनुरी गुरनं. ०७/२०२२ कलम ३७९ भा.दं.वि.
आरोपीकडुन तपासात वरील प्रमाणे पोलीस स्टेशन कळमनुरी हद्दीतील सोयाबीन चोरीचे ०७ गुन्हे उघड करण्यात आले असुन तपासात त्यांचेकडुन गुन्हयात चोरून नेलेले सोयाबीनचे कट्टे एकुण ३० कट्टे किंमत ७५,००० रू. व मोबाईल असा एकुण १,०५,००० रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक हिंगोली जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक हिंगोली श्रीमती अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक स्थागुशा विकास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार राजुसिंग ठाकुर, नितीन गोरे, आकाश टापरे, आझम प्यारेवाले यांनी केली.


