घरफोडी करणार्या आंतरजिल्हा टोळीच्या हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

हिंगोली ः सवीस्तर व्रुत्त असे कीहिंगोली जिल्हयात होणारे चोरी व घरफोडीचे गुन्हयांना आळा घालुन सदर गुन्हे करणारे आरोपी व त्यांचे टोळीला पकडण्याकरीता  पोलिस अधीक्षक हिंगोली जी श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आदेश देवुन वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यावरून पंडीत कच्छवे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि विक्रम विठुबोने यांचे पथक काम करत होते.  मे ते ऑगस्ट २०२३ मध्ये हिंगोली शहरामध्ये अनेक बंद घरे फोडुन सुध्दा घरफोडी झाली होती त्या अनुषंगाने स्थागुशाच्या तपास पथकाने बारकाईने तपास चक्रे फिरवुन अनेक रेकॉर्ड वरिल गुन्हेगारांना तपासले, अनेक संशयीत व स्त्यावर छापेमारी करून गोपनिय माहिती काढली असता बातमीदारा कडुन व सायबर सेलचे तांत्रीक ज्ञान वापरून खात्रीशिर माहिती मिळाली की, मौजे धानोरा ता. कळमनूरी येथील चोरी, घरफोडी करणारे आरोपी

१) उमेश सर्जेराव चव्हान





याने त्याचे इतर साथीदारासह मिळुन हिंगोली शहरातील अनेक घरफोडया केलेल्या आहेत. अशी माहिती मिळाल्या वरून स्थागुशा च्या पोलीस पथकाने आरोपीतांच्या घरी जाऊन छापा मारला असता आरोपी न उमेश सर्जेराव चव्हान हा घरी मिळून आला त्यास विश्वासात घेउन सदर घरफोडी बाबत विचारपुस केली असता त्यांनी त्याचे इतर ०३ साथीदारासह हिंगोली शहरातील घरे फोडल्याचे कबुल सोन्या चांदीचे दागिने, असा एकुण १,३७,०००/- रू चा मुददेमाल जप्त केला. आरोपी कडुन तिन घरफोडीचे गुन्हे उघड झाले आहेत.
सदरची कार्यवाही  पोलिस अधीक्षक  जी श्रीधर,  अपर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटिल, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि.  पंडीत कच्छवे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि विक्रम विठुबोने, पोलिस अंमलदार सुनिल अंभोरे, नितीन गोरे, किशोर सावंत, दिपक पाटील, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले सर्व स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली यांनी केली







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!