
विक्रीकरीता गांजाची साठवणुक करणारे दोघे,हिंगोली स्थागुशा पथकाचे तावडीत…
तब्बल चार लाख बारा हजार रूपये किंमतीचा २० किलो ६०० ग्रॅम शासनाने प्रतिबंधीत केलेला व विक्रीसाठी साठवुन ठेवलेल्या गांजासह दोन इसमांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक……
हिंगोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक हिंगोली यांनी स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली यांना अवैद्य धंदयाविरुध्द व शासनाने प्रतिबंधीत केलेला गांजा लागवड व विक्री विरुध्द प्रभावी कार्यवाही करण्याचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेश दिल्यावरून , दिनांक ०५/०१/२०२४ रोजी सपोनि शिवसांब घेवारे यांचे पथक रात्रगस्त दरम्यान पोलिस स्टेशन हिंगोली ग्रामीण हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पंढरपुर नगर, बळसोंड येथील जगदंब हॉस्पीटलचे पाठीमागे राहत असलेला इसम नामे परसराम मस्के याने त्याचे घरामध्ये बेकायदेशीरपणे शासनाने प्रतिबंधीत केलेला गांजा विक्री करण्यासाठी साठवणुक केली आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने, स्था. गु.शा. पथकाने छापा कार्यवाहीकामी लागणारे सर्व साहित्यासह तात्काळ रवाना होवुन मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा मारला असता तेथे इसम नामे


१) परसराम सुभाषराव मस्के, वय ३९ वर्ष, रा.पार्डा, ह.मु. पंढरपुरनगर, बळसोंड, ता. जि. हिंगोली,

२) रवि रूस्तुमराव पोले, वय ३५ वर्ष, रा. रिसालाबाजार, हिंगोली

हे एका पांढऱ्या रंगाचे नायलोन पोत्यामध्ये गांजाच्या झाडाचा बारीक केलेला अर्धवट ओलसर पाला पाचोळा हिरव्या रंगाचा उग्रट वास येत असलेला एकुण वजन २० किलो ६०० ग्रॅम किंमती ४,१२,०००/- व मोटार सायकल व मोबाईल असा एकुण ४,७२,००० रूपयाचे मुद्देमालासह नमुद दोन इसमाविरुध्द पोलिस स्टेशन, हिंगोली ग्रामीण गुरनं. ०६/२०२४ कलम ८ (क), २० (ब)ii (क) एन.डी.पी.एस. अॅक्ट व सहकलम ३४ भादंवी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पो.नि.विकास पाटील, स.पो.नि. शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार गजानन पोकळे, पारू कुडमेथा, राजु ठाकुर, नितीन गोरे,नरेंद्र साळवे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, प्रशांत वाघमारे यांनी केली आहे.


