हिंजवडी पोलिसांनी पकडला शहरात येणारा १८ लाख रु किंमतीचा गुटखा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

हिंजवडी(पिंपरी-चिंचवड) महेश बुलाख – सवीस्तर व्रुत्त असे की
दिनांक ३/११/२०२३ रोजी तपास पथकातील सपोनि राम गोमारे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन इसम हे बंगलोर मुंबई हायवेने पुनावळेचे दिशेने एक पांढऱ्या रंगाची महींद्रा पिकअप मधुन प्रतिबंधीत तंबाखुजन्य गुटखा व पान मसाला वगैरे पदार्थांची विक्री करण्यासाठी घेऊन जाणार आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने  राम गोमारे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक.श्रीराम पौळ यांना नमुद बातमीची हकीकत सांगुन सपोनि गोमारे यांनी सफौ. मारणे, पो. हवा नरळे, पो.ना  चव्हाण, पो.ना. गडदे, पोशि पालवे, व पोशि  शिंदे असे पोलिस स्टाफसह बंगलोर मुंबई हायवे येथे सापळा लावला असता बातमीतील वर्णनाप्रमाणेची पिकअप महिंद्रा गाडी न्यु सागर हॉटेल समोर, बंगलोर मुंबई हायवे, ताथवडे, पुणे येथुन जाताना दिसल्याने पोलिस स्टाफसह सदर गाडी अडवुन त्यामधील दोन इसमांना त्याचे नाव पत्ता व गाडीमध्ये काय माल आहे असे विचारले असता त्यांनी त्यांचे नाव

१) वाकाराम ठाकरारामजी जाट, वय १९ वर्ष, रा. बालाजी ट्रेडींग कंपनी, जयभवानी हॉटेल जवळ, खालुंब्रे, ता. मावळ, जि. पुणे मुळ गाव मु.पो. शेंडवा, ता. गोरामणी, जि.बाडनेर राजस्थान





२) बोगाराम सुखराम बिष्णोई, वय १९, रा. सदर



असे सांगुन गाडीतील मालाबाबत उडवाडवीची उत्तरे दिली त्यानंतर सदर गाडीची पाहणी केली त्यामध्ये विमल कंपनीचे गुटख्याचे बॉक्स व सुंगधी तंबाखुचे पाऊच मिळुन आले. सदर माल त्याने कोणाकडून आणला या बाबत त्याचेकडे चौकशी करता त्याने सदरचा माल हा पाहीजे आरोपी



सुजीत खिंवसरा, रा. कोथरूड, पुणे

याने विक्रीसाठी आणून दिल्याचे सांगीतले महींद्रा पिकअप वाहन व प्रतिबंधित तंबाखुजन्य गुटखा पदार्थ असा एकुण १८,१८,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करुन आरोपी क्रमांक १ व २ यांना हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १२४३ / २०२३ भा.द.वि. कलम ३२८, २७२, २७३, १८८, ३४ या गुन्हयात दिनांक ०३/११/२०२३ रोजी २१/३० वा. अटक करण्यात आली असुन आरोपी क्रमांक

३)सुजीत खिंवसरा रा. कोथरुड याचा हिंजवडी

पोलिस शोध घेत आहेत. मुखांचे कर्करोग व इतर विकार होऊन
शारिरीक हानी होणारे शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखुजन्य गुटखा व पानमसाला पदार्थाचा साठा करून त्याची विक्री करीता नेत असलेला गुटखा पकडुन त्यातील आरोपींवर कारवाई करून हिंजवडी गुन्हे शोध पथकाने उल्लेखनिय कामगिरी केली आहे.
सदरची कारवाई . विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर डॉ. श्री. संजय शिंदे , सह पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, डॉ. काकासाहेब डोळे, पोलिस उप आयुक्त परि. २, पिंपरी चिंचवड , विशाल हिरे, सहा. पोलिस आयुक्त, वाकड विभाग पिं चिं यांचे मार्गदर्शनाखाली
हिंजवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पौळ, सुनिल दहिफळे पोलिस निरीक्षक (गुन्हे), सोन्याबापु देशमुख पोलिस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे सहा पो. फौजदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, पोलिस हवालदार योगेश शिंदे, कुणाल शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरूण नरळे,पोलिस अंमलदार रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत, यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!