
पिस्तूल आणि काडतुसाची अवैध विक्री करणाऱ्याला अटक…
पिस्तूल आणि काडतुसाची अवैध विक्री करणाऱ्याला अटक…
नाशिक( शहर प्रतिनिधी) – संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, संदिप मिटके, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या व त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते.या मध्ये पोलिसांनी अवैध विक्री करण्यासाठी आलेल्या रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगाराला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करून त्याच्याकडून ६१ हजार रु. किमतीचे २ देशी बनावटीचे पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे हे जप्त केले आहेत.


या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, (दि.१६जून) रोजी गुन्हेशाखा युनिट क्र.१ नाशिक शहर कडील अधिकारी व अंमलदार असे पेट्रोलिंग करीत असतांना पोहवा. प्रदिप म्हसदे व पोना. विशाल देवरे यांना त्यांचे गुप्त बातमीदार याचे मार्फतीने बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील गुन्हेगार सचिन कागडा हा उपनगर मनपा बिल्डींग समोर देशी बनावटीचे पिस्टोल (कट्टा) विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली होती. सदरची माहीती वपोनि. मधुकर कड यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. हेमंत तोडकर, पोउनि.रविंद्र बागुल, पोहवा. विशाल काठे, पोहवा. प्रदिप म्हसदे, पोहवा. प्रविण वाघमारे पोना. विशाल देवरे, पोना. प्रशांत मरकड व चापोअं. समाधान पवार यांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे उपनगर मनपा बिल्डींग समोर सापळा लाऊन सचिन ओमचंद कागडा, (वय-२५वर्षे), रा-रूम नं.४२, उपनगर मनपा हॉस्पीटल शेजारी, नाशिक असे सांगुन त्याचे ताब्यातुन दोन पिस्टल व दोन जिवंत राउंड असा एकुण ६१,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हा जप्त केला असुन आरोपीविरूध्द उपनगर पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ५/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशा प्रकारे सदरची कामगीरी ही पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, संदिप मिटके, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र.१ नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक मधुकर कड, सपोनि.हेमंत तोडकर, पोउनि.रविंद्र बागुल, पोहवा. विशाल काठे, प्रदिप म्हसदे, प्रविण वाघमारे, शरद सोनवणे, धनंजय शिंदे, पोना. विशाल देवरे, प्रशांत मरकड पोअं.जगेश्वर बोरसे, राम बर्डे व चापोअं. समाधान पवार यांनी केलेली आहे.



