जालन्यात समृध्दी महामार्गावर जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

जालन्यात समृध्दी महामार्गावर जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

जालना – जालना जिल्हयातील जबरी चोरी, घरफोडी व मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना जबरी चोरी, घरफोडी व मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.





त्या अनुषंगाने दि.29 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे समृध्दी महामार्गावरील जबरी चोरी प्रकरणातील चंदनझिरा पोलीस ठाणे येथील दाखल गुरनं. 452/2023 कलम 392,34 भादंवि मधील अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी नामे अशोक उर्फ मुक्या भिकाजी तरकसे रा. कन्हैया नगर, जालना याने त्याचा साथीदार याचे सह केला आहे. त्या नुसार आम्ही अशोक भिकाजी तरकसे याचा त्याचे राहते घरी कन्हयानगर येथे शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास विश्वासात घेवुन त्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या साथीदारासह केल्याची कबुली देवुन त्याचेकडुन गुन्हयात जबरी चोरी झालेले रु.1,60,000/- रुपयांचे दागिने ज्यात दोन तोळयाची सोन्याची चैन व एक तोळयाची सोन्याची अंगठी असे एकुण रु.1,60,000/- रुपयांचा संपूर्ण मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच अशोक तरकसे याने वरील गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटार सायकलबाबत विचारणा करता त्याने ती मोटार सायकल बीड शहर येथील लाईफ लाईन हॉस्पीटलसमोरुन चोरी केली असल्याचे सांगितले असुन त्यामध्ये बीड शहर पोलीस ठाणे येथे गु.र.क्र.243/2023 कलम 379 भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल असून सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे.



तसेच पोलीस ठाणे सदर बाजार हद्दीतील गणेश जिनिंग, समर्थ बँकेसमोरुन सुध्दा आरोपी अशोक तरकसे याने हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली असुन त्यामध्ये सदर बाजार पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. 702/2023 कलम 379 भा.द. वि. अन्वये गुन्हा दाखल असून सदर गुन्हा उघडकीस आणलाआहे. तसेच पोलीस ठाणे सदर बाजार हद्दीतील भोकरदन नाका परिसरातील एका हॉटेलचे शटर उचकटुन हॉटेलचे काउंटर मधील रु. 10,000/- रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली असुन त्यामध्ये पोलीस ठाणे सदर बाजार येथे गुरनं. 643/2023 कलम 457,380 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हा उघडकीस आणला आहे.



तरी नमुद आरोपीस पुढील तपासकामी चंदनझिरा पोलीस ठाणे जालना यांच्या ताब्यात दिले आहे. अशा प्रकारे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सपोनि, आशिष खांडेकर, पोउपनि राजेंद्र वाघ व सोबत स्थागुशाचे अंमलदार कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडधे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, सतिष श्रीवास, कैलास चेके, योगेश सहाने, धीरज भोसले, रमेश पैठणे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!