चाळीसगाव सहाय्यक पोलिस अधिक्षक यांचे पथकाची वाळुमाफीयावर धडाकेबाज कार्यवाही,कोटीच्या वर मुद्देमाल जप्त….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

चाळीसगाव उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथकाची अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर धडक कारवाई….

चाळीसगाव(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि(२४) रोजी चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक यांना भडगांव पोलिस स्टेशन हद्दीत वाकगावाजवळ गिरणा नदी पात्रात काही लोक बेकायदेशीररित्या अवैध वाळू उपसा करुन तीची वाहतुक करत आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्याने कायदेशीर कार्यवाही करणे कामी पथकासह सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता त्यावेळी गीरणा नदी पात्रातील वाळु एका जेसीबीच्या सहाय्याने ट्रक्टर मध्ये भरुन एक जेसीबी काठावर साठा करुन ठेवलेली वाळु डंपर मध्ये भरतांना दिसले.
सदर ठिकाणी छापा टाकला असता वाळुने भरलेले टाटा कंपनीचे ०५ डंपर, ५ स्वराज कंपनीचे ट्रक्टर ट्राली, ०२ जेसीबी असा एकुण १,५४,००,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व आरोपी



१) संदीप मुरलीघर पाटील, वय ४१ रा वडगांव सतीचे, ता भडगाव



२) अक्षय देवीदास मालचे वय २० रा. भडगाव खलची पेठ भडगांव ३)प्रविण विजय मोरे वय २० रा. भडगांव वरची पेठ भडगाव





४) मच्छिंद्र गिरधर ठाकरे वय २१५) ललीत रामा जाधव वय – २२रा यशवंती नगर भडगाव
६) शुभम सुनिल भिल, वय २१ रा. यशवंत नगर भडगाव

७) रणजीत भास्कर पाटील, रा महींदळे भडगाव

असे मिळून आले. त्यांना विचारपुस केली असता त्यांनी आम्ही रवी पवार उर्फ रवी पंचर रा भडगांव याचे सांगणेवरुण वाळु चोरी करत आहोत असे सांगीतल्याने सदर इसमांना व वाहनाना ताब्यात घेवुन
त्यांचे विरुध्द भडगाव पोलिस स्टेशनला गु.रं.न. ५०/२०२४ भादवि कलम ३७९/३४ व महाराष्ट्र जमीन महसुल संहीता, १९६६ चे कलम ४८ (७)४८(८) तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ चे कलम १८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील मुख्य आरोपी रवि पंचरवाला याचा शोध घेणे चालु आहे.

सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जळगाव अपर पोलिस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर-पवार चाळीसगाव, सहा पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख चाळीसगाव विभाग यांचे मार्गदर्शनाखली सदर पथकातील सपोनि तुषार देवरे ,नापोशि
राजेंद्र अजबराव निकम, पो हवा भगवान पाटील,पोशि विकास पाटील ,विश्वास सुधकर देवरे,महेश अरविंद बागुल ,चेतन नानाभाऊ राजपुत ,सुनिल मोरे, श्रीराम विठ्ठल कांगणे,समाधान पोपट पाटील राहुल राजेंद्र महाजन ,सुदर्शन घुले असे अधिकारी व अमंलदार यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!