
रेकॅार्डवरील गुन्हेगार गावठी कट्ट्यासह MIDC पोलिसांचे जाळ्यात…
गावठी कट्टा जवळ बाळगणारा रेकॉर्ड वरील गुन्हेगार जळगाव MIDC पोलीसांच्या ताब्यात….
जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(28) रोजी जळगांव शहरातील अजिंठा चौफूली परिसरात भूसावळ रोडवरील बस स्टँडजवळ रोडवर सार्वजनिक जागी रेकॉर्डवरील गुन्हेगार अर्शद शेख हमीद उर्फ अनन वय 24 रा गेंदालाल मिल जळगांव.हा गावठी कट्टा जवळ बाळगूण फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती त्याप्रमाणे सदर ठिकाणी जावून अर्शद यास ताब्यात घेतले असता. त्याचेकडून 35000/रू किं एक गावठी मूगीर बनावटीचा एक गावठी कट्टा व दोन नग जिवंत काडतूस असे जप्त करण्यात आले होते.अवैध गावठी कट्टा बाळगतांना मिळूण आल्याने त्याचेविरूद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यास अटक करण्यात आलेली असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती व्हि एम देशमूख यांनी आरोपी त्यास 05 दिवस पोलिस कस्टडी रिमांड दिली आहे.
सदरची कारवाइ हि पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डि,अप्पर
पोलिस अधिक्षक, अशोक नखाते,उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत.यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे,दिपक जगदाळे सफौ अतूल वंजारी,पोहवा किरण पाटिल, नापोशि सूधीर साळवे, सचिन
पाटिल,किशोर पाटिल ललित नारखेडे राहूल रगडे, नितीन ठाकूर अ केली आहे. सदर अर्शद हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी चार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.




