
जिल्हापेठ पोलिसांनी चोरीच्या ७ दुचाकी केल्या हस्तगत
जिल्हापेठ पोलिसांनी चोरीच्या ७ दुचाकी केल्या हस्तगत
जळगाव – गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्हापेठ पोलिस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटना या दिवसेंदिवस वाढतच होत्या म्हणून जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना तपासा बाबतच्या सूचना पोलिस अधिक्षक डॉ.एम राजकुमार आणि अपर पोलिस अधिक्षक अशोक नखाते यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या होत्या.


आम्ही जेव्हा जिल्हापेठ पोलीस ठाणे चा कार्यभार हाती घेतला, त्यावेळेस मोटार सायकल चोरीचे प्रमाण जास्तीचे होते. तेव्हापासुन आम्ही मोटार सायकल चोरीच्या ठिकाणी स्वतः भेट देवुन, आजुबाजुचे सिसिटीव्ही फुटेज चेक करणे, प्रत्येक मोटार सायकल चोरीच्या घटनास्थळाचा डम्पडेटा घेवुन, त्यावर अभ्यास करणे, असे असतांना एकच नंबर वारंवार येत असल्याने, तसेच ब-याच ठिकाणी अंगकाठी सारखा असलेला इसम हा सिसिटीव्ही फुटेज मध्ये दिसुन येत असल्याने, आम्ही आमचे गुप्त बातमीदार पेरुन, सदर संशयीत इसमाचा शोध घेतला असता, सदरचा इसम हा रावेर तालुक्यातील वाघोदा येथील असल्याचे समजले. त्यानंतर वाघोदा गांवी विचारपुस करता, सदरचा इसम मागील ०१ वर्षापासुन गांवात राहत नसल्याचे समजुन आले.

त्यानंतर आम्ही डम्पडेटा मध्ये आलेला क्रमांकाचा सिडीआर काढता त्यामध्ये एक संशयीत नंबर दिसुन आला, त्या नंबरचा सिडीआर घेता सदरचा नंबर हा एका महीलेचा असल्याचे समजले. त्यावरुन आरोपी याचा चालु नंबर मिळवुन, त्या नंबरचा सिडीआर घेता सदरचा इसम हा काल जळगांव शहरात आल्याचे समजल्याने त्यास अजिंठा चौकातुन ताब्यात घेवुन, त्यास विचारपुस करता त्याने चोरलेल्या ०६ मोटार सायकली काढुन दिलेल्या आहेत. सदरचा आरोपी हा गुरन ६३२/२०२२ भादवी कलम ३७९ या गुन्हयात अटक आहे. तसेच आरोपी याने एमआयडीसी परीसरातुन चोरुन नेलेली मोटारसायकल क्रमांक एम पी १२ बी सी ३१८८ ही त्याने जळगांव शहर रेल्वे स्थानक परीसरात सोडुन दिल्याची कबुली दिल्याने सदरची मोसा जळगांव शहर पोलीस ठाणे येथे लावण्यात आलेली आहे.

तसेच जिल्हापेठ पोलीस ठाणे गुरन ४१३/२०२३ भादवी कलम ३७९ या गुन्हयाचे तपासात गोपनिय माहीतीच्या आधारे सिसिटीव्ही मध्ये दिसत असलेला आरोपी नामे विशाल मुरलीधर दाभाडे (वय-२३), रा. रामेश्वर कॉलनी जळगांव हा मिळुन आल्याने त्यास अटक करण्यात आलेली असुन, त्याचेकडुन १५,०००/- रु. किं ची बजाज डिस्कव्हर कंपनीची मोसा क्र. एम एच १९ ए वाय ९९१७ हि जप्त करण्यात आलेली आहे. या मध्ये पोलिसांनी एकूण १ लाख ८० हजार रु. ०७ मोटार सायकली या हस्तगत केल्या आहेत.
अशा प्रकारे ही कारवाई पोलिस अधिक्षक, डॉ.एम राजकुमार, अपर पोलिस अधिक्षक, अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ. सलीम तडवी, पोना. जुबेर तडवी, पोकॉ.अमितकुमार मराठे, पोकॉ. रविंद्र साबळे, पोकॉ. तुषार पाटील यांनी केली आहे.


