नामांकित कंपनीचे बनावट साबण/शाम्पु बनवून विक्री करणाऱ्या वर पोलिसांचा छापा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

MIDC पोलिस (जळगाव ) -शहरातील मोहाडी रोडवरील नेहरू नगरात बनावट प्रॉडक्ट तयार करून विक्री करणाऱ्या दोन जणांवर बुधवारी १३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ७ लाख ५ हजार ७४५ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, नेहरू नगर व गायत्री नगरातील दोघेजण वेगवेगळ्या कंपनीचे बनावट प्रॉडक्ट तयार करून विक्री करत असल्याची गोपनीय माहिती कंपनीचे फिल्ड अधिकारी सिद्धेश शिर्के यांना समजली व त्यांनी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे,
सचिन मुंढे, पो. ना. योगेश बारी, सचिन पाटील, विशाल कोळी, राहुल रगडे, छगन तायडे, महिला पोकों राजश्री बाविस्कर यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बुधवार, १३ सप्टेंबर रोजी दुपारी छापा टाकला. यात नेहरू नगरात राहणारे जयप्रकाश नारायणदास दारा आणि गायत्री नगरातील आकाश राजकुमार बालानी यांना ताब्यात
घेतले. त्यांच्याजवळून सुमारे ७ लाख ५ हजार ७४५ रुपये किमतीचा झंडूबाम, इनो सिक्सर, आयोडेक्स बाटल्या, हार्पिक पावर, डेटॉल साबण, शाम्पूच्या पुड्या, सर्फ एक्सलचे पाऊच असा बनावट मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कंपनीचे फिल्ड अधिकारी सिद्धेश शिर्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित जयप्रकाश नारायणदास दारा आणि आकाश राजकुमार बालानी
यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!