
अवैधरित्या गुटख्याची विक्री करणारा चाळीसगाव शहर पोलिसांचे ताब्यात….
अवैधरित्या गुटख्याची विक्रीसाठी वाहतुक करणाऱ्याच्या चाळीसगाव शहर पोलिसांनी आवळल्या मुसक्या,अवैध गुटख्यासह वाहन घेतले ताब्यात….
चाळीसगाव(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस निरीक्षक चाळीसगाव शहर यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार एक इसम चाळीसगांव शहरातील तिरंगा पुलावरुन, अवैध रित्या प्रतिबंधीत गुटखा विक्रीसाठी एका वाहनातून जाणार असल्याची गुप्त वातमीदारामार्फत वातमी मिळाल्याने,सहा.पोलिस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, पोलिस निरीक्षक,चाळीसगांव शहर यांनी बाततमीची खात्री करून, पोलिस उपनि योगेश कामडी यांना आदेशीत केले होते


त्यावरून पोलिस पथकासह तिरंगा पूल या ठिकाणी जावून पोलिसांनी तिरंगा पुलावरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली असता दिनांक १३/०३/२०२४ रोजी रात्री १२.१५ वाजता एक इको वाहन क्रमांक MH १९ EA ३९७८ हिची तपासणी केली असता, सदर वाहनात एकूण लहान मोठया अशा १८ गोण्या दिसून आल्याने सदर गोणीमध्ये काय माल आहे याबाबत वाहन चालकास विचारले असता, तो उडवा उडवीचे उत्तरे देवू लागल्याने पोलिसांचा संशय बळावल्याने,पोलिसांनी वाहनात ठेवलेल्या गोण्यांची पाहणी केली असता त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला, मानवी आरोग्यास घातक व अपायकारक असलेला विमल (गुटखा) पान मसाला व सुगंधीत तंबाखु असल्याचे आढळुन आले. वाहन चालकास त्याचे नाव विचारले असता, त्याने त्याचे नाव अक्षय गुलाव कोतकर वय २४ वर्षे, रा. गुरुवर्य नगर, तिरंगा पूलजवळ, चाळीसगांव असे असल्याचे सांगितले. वाहन चालकासह नमुद मुद्देमाल व वाहनासह पोलिस स्टेशनला आणुन, जप्ती पंचनामा करणेकामी सहा.आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग, जळगाव यांना कळविल्याने त्यांनी पोलिसांना कायदेशीर कारवाई
करण्याचे आदेशीत केल्याने दोन पंचासमक्ष जप्ती पंचनामा करुन,
आरोपी नामे अक्षय गुलाव कोतकर याचे ताव्यात १) विमल पान मसाला नावाचा गुटखा असलेले एकुण ०५ गोण्या, २) V-9 तंबाखु असलेले एकुण ०५ गोण्या, ३) विमल पान मसाला नावाचा
गुटखा असलेले एकुण ०३ गोण्या, ४) V-9 तंबाखु असलेले एकुण ०३ गोण्या, ५) विमल पान मसाला नावाचा गुटखा असलेले एकुण ०१ गोणी, ६) V-9 विग तंबाखु असलेले एकुण ०१ गोणी, व ७) एक पांढऱ्या 4 रंगाची मारुती सुझुकी कंपनीचे इको वाहन क्रमांक MH-१९ EA – ३९५८ असा एकुण ०९,२४,०००/- रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला, मानवी आरोग्यास घातक व अपायकारक असलेला विमल(गुटखा पान मसाला व सुगंधीत तंबाखु अवैधरित्या कब्जात बाळगतांना मिळून आला.

सदर मुद्देमाल हा जनहित व जन आरोग्याचे दृष्टीकोनातुन प्रतिबंधीत केलेला अन्नपदार्थ, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला विमल पानमसाला विना परवाना विक्रीच्या उद्देशाने स्वताचे कब्जात
बाळगतांना मिळुन आला म्हणुन नमुद आरोपी विरुध्द चाळीसगांव शहर पो.स्टे. गुरनं. ११२ / २०२४ भा.द.वि. कलम ३२८, १८८, २७२, २७३ सह अन्न व सुरक्षा अधिनियम मानके २००६ चे कलम २६ (२) (iv), ४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीस अटक करुन सदरचा माल हा जप्त करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक. कविता नेरकर,सहा. पोलिस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप पाटील चाळीसगाव शहर, पोलिस उप निरीक्षक, योगेश माळी,पोहवा पंढरीनाथ पवार, नापोशि भुषण पाटील, भटु पाटील,पोशि मनोज चव्हाण सर्व. नेम चाळीसगांव शहर पो.स्टे. यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोउपनि योगेश माळी,नापोशि राकेश पाटील व पोशि कल्पेश पगारे नेम. चाळीसगांव शहर पो.स्टे. हे करीत आहेत.


