पाचोरा येथील बाजोरीया मिल प्रकरणातील आरोपीस अखेर अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

बाजोरीया मिल येथील सुरक्षा रक्षकास मारहाण करुन जबरी चोरी करणा-या आरोपींना पाचोरा गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताब्यात घेऊन गुन्हा केला उघड…..

पाचोरा(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२८)जुलै २०२३ रोजी बाजोरिया मिलचे मालक  आशिष जगदिश बाजोरीया, वय. 48 वर्षे, रा. हिंद ऑईल मिल, देशमुखवाडी, पाचोरा, जि. जळगांव यांनी पोलिस स्टेशन पाचोरा येथे तक्रार दिली की दिनांक 23/07/2023 रोजी पहाटे 03.30 वा. चे सुमारास ऑईलमिल, बाजोरीया ऑईल रिफायनरी व कृषक धान्य व्यापार फॅक्टरी ऑफिस, मोंढाळा रोड, पाचोरा, जि. जळगांव येथे सुरक्षा रक्षक म्हणुन प्रभाकर रामदास पाटील, वय 61 वर्षे, रा. सारोळा, ता. पाचोरा, जि. जळगांव यांस अनोळखी तिन ईसमांनी सुरक्षा रक्षक याचे हात पाय बांधुन त्यास चाकुचा धाक दाखवुन 1) 4,05,000/-
रुपये रोख रक्कम त्यात 500 रुपये दराच्या चलनी नोटा 2) 5,000/- रुपये किंमतीचे गोदरेज कंपनीची तिजोरी 3)
1,000/-रुपये किंमतीचे सोनेरी रंगाचे भिस्कीटे पेपर वेट म्हणुन वापरायचे 4) 6,000/-रुपये किंमतीचा डी. व्ही. आर मशीन 5) 1,000/- रुपये किंमतीचा मोबाईल असा एकुण 4,18,000/- रुपये किंमतीचा मुददेमाल हा बळजबरीने हिसकावुन घेवुन गेले याबाबत पाचोरा पोलिस स्टेशन गु. रजि. क्रमांक 267/2023 भादवि कलम 394, 458, 34 प्रमाणे दिनांक 23/07/2023 रोजी 12.36 वा. गुन्हा नोद आहे.





सदर गुन्हयाचे अनुषंगाने पाचोरा पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकटी करण पथकाचे अंमलदार पोहवा राहुल काशिनाथ शिंपी,पोशि योगेश सुरेश पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज व गुन्हयाचे तांत्रीक विश्लेषण करुन तसेच त्यांना त्यांचे गुप्तबातमीदारां मार्फेत खात्रीशीर माहीती मिळाली की यातील  संशयीत आरोपी हे त्यांचे घरी आलेले आहेत अशी माहिती मिळाल्याने त्यांनी सदर माहिती पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना कळवुन त्यांचे परवानगीने यातील संशयीत आरोपी 1) अल्ताफ मसुद खान, वय. 31 वर्षे, रा. नुराणीनगर, जारगांव, ता. पाचोरा, जि. जळगांव 2) सरफराज हसन शहा फकीर, वय 22 वर्षे, रा. मुल्लावाडा, जामनेर रोड, पाचोरा, जि. जळगांव यांना विचारपुस करुन त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांचा सदर गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.



सदर गुन्हयात त्यांचा साथीदार मुक्तार उर्फे धडया मेहबुब शेख, रा. नुराणीनगर, जारगांव, जि. जळगांव हा गुन्हा केल्या पासुन फरार आहे. वरील दोन्ही आरोपींनी गुन्हयात वापरेलेले 1) पिस्टल सारखे दिसणारे लायटर 2) एक 12.5 इंच असणारा सुरा (चाकु) व गुन्हयात गेलेले रोख 50,000/-रु. रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आलेली आहे.



सदरची कामगिरी ही पोलिस अधीक्षक महेश्वर रेडडी, अप्पर पोलिस अधीक्षक चाळीसगांव परिमंडळ  कविता नेरकर, उप विभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक पवार, पोउपनिरी  प्रकाश चव्हाणके,पोहवा राहुल काशिनाथ शिंपी,पोशि योगेश सुरेश पाटील यांनी पार पाडली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!