चाकुचा धाक दाखवुन लुटणारे व गाडी हिसकाऊन नेणारी टोळी स्ऱ्थागुशा पथकाचे ताब्यात…
चाकुचा धाक दाखवुन लुटणारी व कार हिस्कावणारी अहमदनगर जिल्हयातील अट्टल गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद…
जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जालना जिल्हयात किमती मालाविरुध्द गुन्हयांवर अंकुश ठेवण्याचे व गुन्हेगारावर कारवाई करणे बाबत नवनियुक्त पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ व पथकास सुचना दिल्या होत्या. त्यानुसार
दिनांक 04/02/2024 रोजी कार हिस्कावुन नेणाऱ्या टोळीबाबत स्थानिक गुन्हे शाखा जालना पथकास गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यावरुन श्री रामेश्वर खनाळ पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांनी स्थागुशाचे विशेष पथक तयार करुन नेवासा जिल्हा, अहमदनगर येथे पाठवुन आरोपींना ताब्यात घेण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार जालना शहरामध्ये घडलेल्या घटनांची माहिती मिळवली असता चंदनझिरा पोलिस ठाणे गु.र.क्र.33/2024 कलम 392,34 भा.द.वि. मध्ये कार हिस्कावुन नेल्याची घटना घडलेली असल्याचे दिसुन आले. त्यानुसार पथकाने नेवासा जि. अहमदनगर येथे जावुन मुकींदपुर शेतवस्ती येथे इसम नामे
शेख फिरोज शेख अजीज वय-32 वर्ष, रा. लक्ष्मीनगर, नेवासा फाटा, जि. अहमदनगर
याचा त्याचे राहते घरामध्ये शोध घेत असतांना त्याने पोलिसांना पाहुन शेतात धुम ठोकली. त्यामुळे त्याचा उसाच्या शेतामध्ये जवळपास दीड ते दोन किलोमीटर पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्यास त्याचे घरासमोर उभी असलेल्या कारबाबत विचारणा करता त्याने ती कार जालना येथील समृध्दी टी पाँईट समोरील रस्त्यावरुन एका इसमास त्याचे इतर तीन साथीदारांसह चाकुचा धाक दाखवुन बळजबरीने हिस्कावुन नेल्याची कबुली दिली. त्यामुळे त्याचे साथीदारांचा नेवासा येथे शोध घेतला असता इसम नामे
आरोपी क्र 2) सुदाम विक्रम जाधव वय 27 वर्ष रा. सुलतानपुर ता. नेवासा जि. अहमदनगर
आरोपी क्र 3) अमर चिलु कांबळे वय 29 वर्ष रा. नेवासाफाटा, मुकींदपुर ता. नेवासा जि. अहमदनगर
हे मिळुन आले असुन आणखी एक साथीदार फरार आहे. त्यामुळे आरोपींकडुन गुन्हयातील चोरी गेलेली स्विफ्ट डिझायर कार जप्त
करण्यात आली आहे.नमुद आरोपींचा रेकॉर्ड पाहता त्यांच्यावर जालना, अहमदनगर, पुणे, नाशिक येथे यापुर्वी महिलांचे मंगळसुत्र जबरी चोरी व इतर गंभीर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहे. तसेच नमुद आरोपी अहमदनगर जिल्हयातील अभिलेखावरील अट्टल गुन्हेगार आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक अजय कुमार बंन्सल, अपर पोलिस अधीक्षक. आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली रामेश्वर खनाळ, पोलिस निरीक्षक स्थागुशा जालना, सपोनि योगेश उबाळे, सपोनि शांतीलाल चव्हाण, पोउपनि राजेन्द्र वाघ, पोलिस शिपाई सॅम्युअल कांबळे, विनायक कोकणे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, सागर बाविस्कर, गोपाल गोशिक, लक्ष्मीकांत आडेप, योगशे सहाने, देविदास भोजने, सतिश श्रीवास, सचिन आर्य, कैलास चेके, धिरज भोसले, रवि जाधव, सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे.