
अवैधरित्या विक्रीसाठी गांजा बाळगणारा स्थागुशा पथकाचे ताब्यात…
मानवी आरोग्यास घातक असलेला अवैध गांजा बाळगणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद….
जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयात अवैध गांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अवैध गांजा विक्री करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना देवून मार्गदर्शन केले होते.
त्यानुषंगाने दिनांक 08/02/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदार यांचे मार्फतीन माहिती मिळाली की, मौजे नाव्हा गावात इसम नामे राजु नारायण
क्षीरसागर रा. नाव्हा ता.जि. जालना हा त्याचे घरात मानवी आरोग्यास हानीकारक असलेला गांजाची अवैध पणे स्वत:चे आर्थीक फायद्यासाठी विक्री करत असल्याची माहिती मिळाली. मिळाले बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा जालना येथील पोलिस अधिकारी व अमंलदार यांनी मौजे नाव्हा ता.जि.जालना येथे
इसम नामे राजु नारायण क्षीरसागर याचे घरी छापा मारुन त्याच्या ताब्यातुन एकुण 02 किलो 088 ग्रॅम वजनाचा गांजा किमंती 20,880/- रुपयाचा माल जप्त केला असुन सदर इसमा विरुध्द पोलिस ठाणे तालुका जालना येथे एन.डी.पी.एस. कायद्या प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक.आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सपोनि योगेश उबाळे, सपोनि शांतीलाल चव्हाण, पोउपनि. राजेंद्र वाघ व सोबत स्थागुशाचे अमंलदार,सॅम्युअल कांबळे, संभाजी तनपुरे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, रमेश राठोड, प्रशांत लोखंडे, विजय डिक्कर,
सतिश श्रीवास, सचिन आर्य, धीरज भोसले, योगेश सहाने, कैलास चेके, रमेश पैठणे सर्व स्थागुशा यांनी केली आहे.




