गावठी कट्यासह जिवंत काडतूस – तलवार बाळगणाऱ्यांच्या जालना गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गावठी कट्यासह जिवंत काडतूस – तलवार बाळगणाऱ्यांच्या जालना गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…

जालना (प्रतिनिधी) – जालना जिल्ह्यात अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकास सुचना दिल्या होत्या. त्यावरुन अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शना खाली सचिन सांगळे, उप विभागीय पोलिस अधिकारी जालना व पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, स्थागुशा जालना यांनी स्थागुशाचे वेगवेगळे पथके तयार करुन कारवाई करण्या बाबत पथकाला मार्गदर्शन केले होते. या कारवाई मध्ये अवैध अग्निशस्त्र, गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे आणि तलवार बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगारांना शिताफीने अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 21 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.





या बाबत अधिक माहिती अशी की, दि.16 डिसेंबर रोजी जालना शहरातील विविध भागात व पोलिस ठाणे मौजपुरी हद्यीत मौजे रामनगर येथे छापे मारुन गोपनीय माहिती व तांत्रिक माहिती च्या आधारे पोलिस ठाणे कदिम जालना हद्दीत इसम नामे 1) आशिष ईश्वर चव्हाण (वय 32 वर्षे), रा. मधुबन कॉलनी जालना, 2) राहुल बाबुराव पवार (वय 31 वर्षे), रा.कैकाडी मोहल्ला जालना तसेच पोलिस ठाणे सदर बाजार जालना हद्यीत इसम नामे 1) चरण प्रल्हाद रायमल (वय 27 वर्षे), रा.म्हाडा कॉलनी जालना 2) किरण देवानंद (भोसले वय 23 वर्षे), रा. इंदिरानगर जालना, पोलीस ठाणे मौजपुरी हद्दीत इसम नामे 1) गणेश श्रीराम यज्ञेकर (जोशी) (वय 27 वर्षे), रा.रामनगर (कारखाना) ता.जि. जालना, 2) संदिप ज्ञानेश्वर यज्ञेकर (जोशी) (वय 24 वर्षे), रा.रामनगर (कारखाना) ता.जि. जालना यांच्या कडुन प्रत्येकी एक प्रमाणे एकुण 06 गावठी पिस्टल व एकुण 12 जिवंत काडतुस तसेच एक धारदार टोकदार तलवार व 05 मोबाईल असे एकुण 3,50,700/- रुपये किमतीचा मुद्येमाल जप्त केला असुन, नमुद आरोपींविरुद्ध पोलिस ठाणे कदिम जालना, सदर बाजार जालना व मौजपुरी येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्यातील ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध्द पोलिस ठाणे मौजपुरी येथे दोन पोलीस ठाणे सदर बाजार येथे दोन, पोलिस ठाणे कदिम जालना येथे दोन असे एकुण सहा गुन्हे दाखल करण्यात आले असुन, गुन्ह्यातील सर्व आरोपीतांना (दि.21डिसेंबर) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.



सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन सांगळे, उप विभागीय पोलिस अधिकारी जालना, रामेश्वर खनाळ, पोलिस निरीक्षक स्थागुशा, आशिष खांडेकर, सहा.पोलिस निरीक्षक, राजेंद्र वाघ, पोलिस उप निरीक्षक पोहवा सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, राम पव्हरे, कृष्णा तंगे, रमेश राठोड, रुस्तुम जैवाळ, सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, गोपाल गोशिक, लक्ष्मीकांत आडेप, संभाजी तनपुरे, विजय डिक्कर, फुलचंद गव्हाणे, सुधीर वाघमारे, दत्तात्रय वाघुंडे, सागर बाविस्कर, सतिष श्रीवास, देविदास भोजने, आक्रुर धांडगे, भागवत खरात, रवि जाधव, योगेश सहाने, धिरज भोसले, कैलास चेके, सचिन राऊत, चालक संजय राऊत, सौरभ मुळे सर्व स्थागुशा जालना व पोलिस ठाणे कदिम जालना येथील सदा राठोड, बाबा गायकवाड यांनी केली आहे. केलेल्या या धाडसी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक जालना यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम ला रोख 15 हजार रुपयाचे बक्षिस जाहिर केले आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!