
गावठी कट्यासह जिवंत काडतूस – तलवार बाळगणाऱ्यांच्या जालना गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…
गावठी कट्यासह जिवंत काडतूस – तलवार बाळगणाऱ्यांच्या जालना गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…
जालना (प्रतिनिधी) – जालना जिल्हयात अवैध गावठी पिस्टल तलवार बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ व पथकास सुचना दिल्या होत्या. त्यावरुन अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली रामेश्वर खनाळ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे वेगवेगळे पथके तयार करुन त्यांना कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करत होते.


त्या अनुषंगाने (दि.18डिसेंबर) रोजी जालना शहरातील विविध भागात छापे मारुन गोपनीय माहिती आधारे पोलीस ठाणे सदर बाजार हद्दीत इसम नामे अतुल ऊर्फ अमर गणेश पवार, (वय-39 वर्ष), रा.हमालपुरा, जालना 2) गौरव राजेश जटावाले (वय 23 वर्षे), रा.नारळबाग छत्रपती संभाजीनगर, 3) शैलेश ऊर्फ बाळा संदिप पठाडे (वय 26 वर्षे), रा.डिबंर गल्ली बेगमपुरा छत्रपती संभाजीनगर, 4) रोहित शाम शिनगारे, (वय 30 वर्षे), रा.पिवळा बंगला जालना यांच्या कडुन दोन गावठी पिस्टल, 04 जिवंत काडतुस जप्त केले आहेत. तसेच पोलीस ठाणे कदीम जालना हद्यीत धारदार टोकदार तलवार हात घेऊन फिरणारा इसम नामे सय्यद ईरफान उर्फ ईप्पु अब्दुल रज्जाक (वय 23 वर्ष) रा.मियासाब दर्गा जालना यास ताब्यात घेऊन त्याच्या कडुन एक धारदार टोकदार तलवार जप्त केली आहे. असा एकुण 02,06,400/- रुपयाचे दोन गावठी पिस्टल, चार जिवंत काडतुस, तलवार व मोबाईल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपी विरुध्द पोलीस ठाणे सदर बाजार जालना व पोलीस ठाणे कदीम जालना येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली रामेश्वर खनाळ, पोलीस निरीक्षक स्थागुशा जालना, आशिष खांडेकर, सहायक पोलीस निरीक्षक, राजेंद्र वाघ, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोंद गडदे, रामप्रसाद पव्हरे, कृष्णा तंगे, रमेश राठोड, रुस्तुम जैवाळ, सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, लक्ष्मीकांत आडेप, संभाती तनपुरे, गोपाल गोशिक, विजय डिक्कर, फुलचंद गव्हाणे, सुधीर वाघमारे, दत्तात्रय वाघुंडे, सागर बाविस्कर, सतिष श्रीवास, आक्रुर धांडगे, भागवत खरात, रवि जाधव, योगेश सहाने, धिरज भोसले, कैलास चेके, सचिन राऊत, चालक संजय राऊत, सौरभ मुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे.



