बारमधे चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने परभणी येथुन घेतले ताब्यात….
धारकल्याण येथील दिपकराज बार मध्ये चोरी करणारा परभणी येथील सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन मुद्येमाल केला जप्त…..
जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(16) ॲागस्ट 2024 रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास सिंदखेडराजा ते जालना रोडवरील धारकल्याण येथील हॉटेल दिपकराज बार मध्ये चोरी करुन दारुच्या विविध कंपनीच्या बाटल्या चोरी झाले बाबत फिर्यादी सुंदर दिनकर इंगोले रा. धारकल्याण जालना यांच्या फिर्यादीवरुन पोस्टे तालुका जालना येथे गुरंन 526/2024 कलम 305 (A),334 (1) भारतीय न्याय संहिता अन्वये अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलिस अधिक्षक अजय कुमार बसंल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांनी सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.
त्यानुषंगाने दिनांक 24/08/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना सदरचा गुन्हा आरोपी शेरुसिंग सोजितसिंग भोंड वय 22 वर्ष रा. जिल्हापरीषद जवळ अण्णाभाऊ साठेनगर जिल्हा परभणी याने व त्याचे साथीदार यांनी केला असल्याची माहिती मिळाली त्यावरुन शेरुसिंग सोजितसिंग भोंड यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातुन रुपये 60265/- किमतीच्या विविध कंपनीच्या दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल,अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे,सपोनि शांतीलाल चव्हाण, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलिस अंमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, रामप्रसाद पव्हरे, सुधीर वाघमारे, कैलास खार्डे, भाऊराव गायके, लक्ष्मीकांत आडेप, जगदीश बावणे, रुस्तुम जैवाळ, सागर बाविस्कर, इरशाद पटेल, संदीप चिंचोले. सौरभ मुळे सर्व स्थागुशा, जालना यांनी केली आहे.