गावठी बनावटीची पिस्टल बाळगणार्यास गुन्हे शाखेने शिताफीने घेतले ताब्यात…
स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्यास ताब्यात घेवुन त्याच्या ताब्यातुन गावठी पिस्टल केले जप्त….
जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्ह्यात अवैध गावठी पिस्टल बाळगणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करणेबाबत पोलिस अधिक्षक अजयकुमार बसंल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने त्यांचे अधिनस्त असलेल्या पथकास सुचना दिल्या होत्या.
त्यावरुन अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्थागुशा पंकज जाधव यांनी स्थागुशाचे पथक तयार करुन कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने दि.(10) ॲागस्ट 2024 रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इंदेवाडी परिसरामध्ये एक इसम जवळ गावठी पिस्टल बाळगुन आहे अशा माहीतीवरुन सदर ठिकाणी जाऊन त्याचा इंदेवाडी परिसरामध्ये शोध घेत असतांना शुभांगी टी हाऊस, इंदेवाडी, जालना येथे सदर ईसमास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने आकाश कैलाश चिप्पा रा.लक्ष्मी नारायणपुरा मस्तगड जुना जालना असे सांगितले त्याची झडती घेतली असता तो ताब्यात व कब्जात एक गावठी पिस्टल आढळुन आली यावरुन सदर इसम आकाश कैलाश चिप्पा रा. लक्ष्मी नारायणपुरा मस्तगड जुना जालना याचे विरुध्द तालुका पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अजय कुमार बंसल,अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, सपोनि शांतीलाल चव्हाण, पोउपनि राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार देविदास भोजने, भागवत खरात, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, अक्क्रुर धांडगे, सोपान क्षीरसागर सर्व स्थागुशा, जालना यांनी केली