
जालना गुन्हे शाखेने ८ तासाचे आत उघड केला चोरीचा गुन्हा,मुद्देमाल हस्तगत…
देवमुर्ती येथील चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेने ८ तासाचे आत केला उलगडा,दोन आरोपींना ताब्यात घेऊन ७,१४,३८०/- रु चा मुद्देमाल केला जप्त….
जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयातील जबरी चोरी, घरफोडी गुन्हे उघडकीस आणनेबाबत पोलिस अधिक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.


दि(11) जुलै रोजी देवमुर्ती ता.जि.जालना येथील नामे विठ्ठल तुकाराम चव्हाण रा. देवमुर्ती ता.जि.जालना यांचे घरी दिवसा जबरी चोरी झालेल्या प्रकरणात पोलीस ठाणे तालुका जालना गुरनं. 515/2024 कलम 309(4) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल होऊन स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्हयातील अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी नामे 1) अर्जुनसिंग छगनसिंग भोंड वय 24 वर्ष रा. गुरुगोविंदसिंग नगर, जालना व 2) सागरसिंग फंट्यासिंग अंधरेले उर्फ बावरी वय 24 वर्ष रा. हरिगोविंद रेसीडेंन्सी, सरस्वती मंदीरा जवळ जालना यांनी मिळुन केला आहे. तसेच ते देऊळगावराजा कडे गेले आहेत. अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी वेगवेगळे पथके तयार करुन वेगवेगळे ठिकाणी सापळा रचुन आरोपीतांचा देऊळगावराजा, सिंदखेडराजा जि. बुलढाणा पर्यंत पाठलाग केला. आरोपी पुन्हा जालना जिल्हयाकडे निघाल्याने त्यांना कन्हैया नगर चौफुली येथे शिताफीने ताब्यात घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात येऊन त्याने गुन्हा केल्याचे कबुली देऊन त्याचे कडुन एकुण 7,14,380 रुपये किंमतीचा गुन्हयात गेलेला रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने, गुन्हया करतांना वापरलेले हत्यार, गुन्हयात वापरण्यात आलेली चारचाकी वाहन असे जप्त करण्यात आले असुन नमुद दोन्ही आरोपीतांना पुढील तपासकामी तालुका जालना पोलिस ठाणे जालना यांच्या ताब्यात दिले आहे. सदर आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन सागरसिंग फंट्यासिंग अंधरेले उर्फ बावरी याचे वर 31 मालाविरुद्धचे गुन्हे तसेच अर्जुनसिंग छगनसिंग भोंड याचे विरुद्ध 27 मालाविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक . पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, सपोनि शांतीलाल चव्हाण, पोउपनि .राजेंद्र वाघ सोबत पोलिस अंमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, रमेश राठोड, रामप्रसाद पव्हरे, भाऊराव गायके, लक्ष्मीकांत आडेप, सुधीर वाघमारे, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, ईरशाद पटेल, सतिश श्रीवास, आक्रुर धांडगे, देविदास भोजणे, संदीप चिंचोले, धीरज भोसले, योगेश सहाने सर्व स्थागुशा, जालना यांनी व तालुका पोलीस ठाणेचे पोअं चंद्रकांत माळी, लक्ष्मण शिंदे, ग्रामिण वाहतुक शाखेचे सपोउपनि सुधाकर नागरे, पोशि विनायक चित्राल यांनी केलेली आहे.



