मानवी शरीरास घातक प्रतिबंधित अशा औषधाची विक्री करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

मानवी आरोग्यास घातक असलेले एन.डी.पी.एस. घटक प्रतिबंधीत गुंगीकारक औषधी व टॅबलेट (गोळ्या) विक्री करणाऱ्याविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…

जालना(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्ह्यात मानवी आरोग्य घातक असलेले व एनडीपीसी घटक प्रतिबंधीत असलेले गुंगीकारक औषधी व टॅबलेट (गोळ्या ) विक्री करणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत.पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, आयुष नोपाणी प्रभारी पोलिस अधीक्षक जालना यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  रामेश्वर खनाळ व पथकास सुचना दिल्या होत्या.त्यावरुन अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली  रामेश्वर खनाळ पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे वेगवेगळे पथके तयार करुन कारवाई करण्या बाबत मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने दिनांक 10/01/2024 रोजी परतुर शहरात परतुर ते वाटुर रोडवर छापा मारुन गोपनिय माहिती आधारे इसम नामे अब्दुल ऊर्फ अज्जु अझीझ मोहम्मद बोगदीन वय 27 वर्षे, रा. चाऊसगल्ली गावभाग परतुर ता. परतुर याचे वर छापा कारवाई करुन त्याचे कडुन मानवी आरोग्यास अपायकारक व नशे करीता गैरवापर होणारे Nitrazepam, Alprazolm,Codeine असे प्रतिबंधीत घटक असलेल्या गोळ्या (टॅबलेट) व औषधी एकुण कि. 74709/-
रुपयाचा माल मिळुन आल्याने श्रीमती वर्षा महाजन अन्न औषध निरीक्षक, अन्न औषध प्रशासन विभाग जालना यांचे उपस्थित जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपी विरुध्द पोलिस ठाणे परतुर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





सदरची कारवाई ही.पोलिस अधीक्षक  शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली  रामेश्वर खनाळ, पोलिस निरीक्षक स्थागुशा जालना, .आशिष खांडेकर, सहायक पोलिस निरीक्षक,  राजेंद्र वाघ, पोलिस उप निरीक्षक, पोलिस अमंलदार सुधीर वाघमारे, रामप्रसाद पव्हरे, रमेश राठोड, सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, फुलचंद गव्हाणे, विनायक कोकणे,
विजय डिक्कर, सतिश श्रीवास, अक्रुर धांडगे, देविदास भोजने, धिरज भोसले, धम्मपाल सुरडकर, रमेश पैठणे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!