जम्मू काश्मीर मध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला…
जम्मू काश्मीर मध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला…
जम्मू काश्मीर – जम्मू काश्मीर मध्ये मोठी धक्कादायक घटना घडली आहे. या मध्ये भाविकांच्या एका बसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा आकडा वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेने जम्मू-काश्मीरमध्ये खळबळ माजली आहे.
जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील शिवखोडी गुंफा यात्रेसाठी भाविकांची एक प्रवासी बस जात होती. या बसवर आज संशयित दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली होती. या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. तसेच या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
सुरुवातीच्या अहवालानुसार शिव खोरीहून कटरा येथे जाणाऱ्या प्रवासी बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. गोळीबारामुळे बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस खोऱ्यात पडली. या घटनेत 33 जण जखमी झाल्याची माहिती एसएसपी रियासी मोहिता शर्मा यांनी दिली आहे.