
महीलांचे गळ्यातील दागिणे हिसकावणारा अट्टल चोरटा स्थागुशा पथकाचे ताब्यात…
महिलांच्या गळ्यातील दागिणे चोरणार्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,त्याचेकडुन 280 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व वाहनासह 19 लाख 94 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त…..
लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,महीलांचे गळ्यातील मंगळसूत्र, गंठण, चोरणाऱ्या गुन्ह्यातील आरोपीला अटक. सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल, कार असा एकूण 19 लाख 94 हजार रुपयांचा 280 ग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त. 16 गुन्हे उघड. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.


याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरी व चैन स्नॅचिंग चे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलिस अधिकारी/अंमलदारांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकामार्फत जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते.
आरोपीचा शोध घेण्यासाठी सदर पथक रात्र- दिवस परिश्रम घेत होते. तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती. दरम्यान दि.(21)रोजी विशेष पोलिस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चोरलेले सोन्याचे दागिने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला गूळमार्केट परिसरातून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव

1) सौदागर उर्फ विशाल मोहन रसाळ,वय 32 वर्ष, रा. महादेवनगर, खंडापुर सद्या राहणार भामरीचौक,लातूर.

असे असल्याचे सांगितले. नमूद आरोपीला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने सांगितले की, तो मागील काही वर्षापासून लातूर शहरातील रियाझ कॉलनी, पद्मा नगर, शारदा नगर, विशाल नगर, भाग्य नगर, अवंती नगर इतर विविध ठिकाणाहून रस्त्या वरून एकटी/ पायी जाणारे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण हिसका मारून,चोरून मोटार सायकल वरून निघून जाण्याचे गुन्हे केल्याचे कबूल केले.
त्यावरून लातूर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांचे अभिलेखाची माहिती घेतली असता पोलिस ठाणे शिवाजी नगर, व पोलिस ठाणे एमआयडीसी येथील मंगळसूत्र चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले आहेत.
सदर आरोपीने वर नमूद गुन्हा पैकी 16 गुन्ह्य्यात चोरलेले सोन्याचे 280 ग्रॅम वजनाचे 16 मंगळसूत्रे, गंठण व विविध दागिने काढून दिल्याने ते जप्त करण्यात आले आहे. इतर गुन्ह्यातील दागिने विकून खरेदी केलेली एक कार व मोटार सायकल असा एकूण 19,94,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक सोमय मुंडे,अपर पोलिस अधिक्षक डॅा अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले,यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक, वेंकटेश पल्लेवाड, प्रवीण राठोड, सफौ बेल्लाळे, पोलिस अमलदार युवराज गिरी, अर्जुन राजपूत, मुन्ना मदने, खुर्रम काझी, रवि गोंदकर , दीनानाथ देवकते, यशपाल कांबळे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, प्रदीप स्वामी, सायबर सेल चे संतोष देवडे, गणेश साठे यांनी केली आहे.


