चाकुर सहा.पोलिस अधिक्षकांचा पथकाचा अवैध दारु विक्रेत्यावर छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

चाकुर हद्दीत विक्रीसाठी अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या 4 व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल. 4 लाख 48 हजार रुपयाचा वाहनासह दारूचा मुद्देमाल जप्त. सहाय्यक पोलिस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांची कारवाई….

चाकुर(लातुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक .सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांनी त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर चाकुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नळेगाव शिवारातील रोडवर सापळा लावून देशी दारूची चोरटी विक्री व्यवसाय करण्यासाठी अवैध वाहतूक करीत असलेल्या वाहनाला दारूच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या चार इसमा विरुद्ध पोलिस ठाणे चाकूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दिनांक 26/02/2024 रोजी नळेगाव परिसरातून एका वाहनातून देशी दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती वरून उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर यांनी बेकायेशीररित्या अवैधपणे देशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्यामध्ये वेगवेगळ्या नावाची 48 हजार 720 रुपयाची देशी दारू मिळून आली. देशी दारूची अवैध वाहतूक करीत असलेल्या चार इसम





1)विकी परशुराम टोम्पे, वय 22 वर्ष,राहणार नळेगाव, तालुका चाकूर जिल्हा लातूर.



2)इरफान मोहिद्दीन शेख, वय 26 वर्ष,राहणार नळेगाव, तालुका चाकूर जिल्हा लातूर.



3)राम आदमाने(फरार)राहणार नळेगाव, तालुका चाकूर जिल्हा लातूर.

4) नवनाथ आदमाने (फरार)राहणार नळेगाव, तालुका चाकूर जिल्हा लातूर.

यांचेवर कार्यवाही करत त्यांच्याकडून देशी दारू व वाहनासह एकूण 4 लाख 48 हजार 720 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस ठाणे चाकूर मध्ये नमूद इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. फरार आरोपीचा शोध सुरू आहे पुढील तपास चाकुर पोलीस करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक .सोमय मुंडे,अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांचे नेतृत्वातील पथकामधील पोलिस अधिकारी/अंमलदार यांनी सदरची कामगिरी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!