मारहान करुन मोबाईल चोरणारी टोळी लातुर LCB च्या पथकाने केली जेरबंद….
मारहाण करून मोबाईल चोरणाऱ्यांकडुन 1 लाख 82 हजार रुपयांचे मुद्देमालासह लातूर मधुन स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….
लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे विवेकानंद चौक लातूर हद्दीमध्ये लातूर ते सारोळा रोड जाणार्यांना मोटारसायकल वरून येऊन मारहाण करून मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली होती.अशा तक्रारीवरुन पोलिस ठाणे विवेकानंद चौक लातूर येथे कलम 394, 34 भादवी प्रमाणे 2 गुन्हे दाखल झाला होता.
सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केले होते. त्यावरून पोलिस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या. सदर पथका कडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना मोठ्या प्रमाणात बातमीदार नेमून तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी परिश्रम घेण्यात येत होते. वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी केलेल्या परिश्रमामुळे पथकांना गुप्त बातमीदाराकडून मोटार सायकल वर येऊन मारहाण करून मोबाईल चोरीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली.
सदर माहितीची बारकाईने अभ्यास व विश्लेषण करून मोटर सायकल वर येऊन मोबाईल चोरी करून ते मोबाईल कमी किमतीत लोकांना विकणाऱे आरोपी 1) परमेश्वर निवृत्ती बोयने वय 19 वर्ष, राहणार शास्त्री नगर लातूर. 2 )समीर आजम पठाण, वय 19 वर्ष, राहणार शास्त्रीनगर लातूर यांना निष्पन्न करून, सदर आरोपीं कडुन दिनांक 3/06/2024 रोजी गरुड चौक लातूर येथून समोरून ताब्यात घेण्यात आले आहे. सदर पथकांनी अतिशय कुशलतेने व उत्कृष्टपणे नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन नमूद आरोपीला गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व मोबाईलसह ताब्यात घेण्यात आले.
यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी त्याच्या आणखीन एक साथीदारासह विवेकानंद चौक लातूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत लातूर ते सारोळा रोड रस्त्याने जाणाऱ्या एका नागरिकाला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल दोघांनी चोरल्याचे कबुल केले.
नमूद आरोपीने चोरलेला मुद्देमाल रोख 28 हजार रुपये 7 मोबाईल व गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल असा एकूण 1 लाख 82 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला नमूद गुन्ह्यात अटक करणे कामी पोलीस ठाणे एमआयडीसीच्या ताब्यात देण्यात आले आहे.फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
सदर कारवाईत पोलिस ठाणे विवेकानंद चौक लातूर येथील 2 मोबाईल चोरीचा गुन्हा उघड झाला असून मोबाईल चोरीचे आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे विवेकानंद चौक लातूर पोलिस हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक सोमय मुंडे,अपर पोलिस अधिक्षक डॅा अजय देवरे,यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलिस हवालदार राहुल सोनकांबळे,राजेश कंचे, मोहन सुरवसे, अर्जुन राजपूत पोलीस शिपाई मनोज खोसे, नितीन कटारे, राहुल कांबळे, चापोह केंद्रे यांनी केली आहे.