
लातुर LCB पथकाने प्रतिबंधित अशा तंबाखु,पानमसाल्यासह दोघास घेतले ताब्यात…
लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहनासह 3 लाख 43 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू केला जप्त….
लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,,पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व प्रभारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित होते


त्यानुसार अवैध धंद्याची माहिती काढत असताना दि 14/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकास खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की, पोलिस ठाणे गांधी चौक हद्दीमध्ये लेबर कॉलनी परिसरात रोडवर एका लाल रंगाची स्विफ्ट कार थांबलेली असून त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री करण्यासाठी साठवणूक करण्यात आली आहे.

अशा खात्रीशीर बातमीवरुन सदर माहितीची शहानिशा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 14/10/2024 रोजी गांधी चौक हद्दीमध्ये लेबर कॉलनी परिसरात रोडवर एका लाल रंगाच्या स्विफ्ट कार ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्या मध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला 45350/- रूपयाचा गुटखा व सुगंधित पानमसाला असा व एक स्विफ्ट कार असा एकूण 343350/- रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पानमसाला, तंबाखूचा मुद्देमाल मिळून आल्याने तो मुद्देमाल जप्त करण्यात आला

तसेच प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक करणारे 1) अमान जकियोदीन सय्यद, वय 19 वर्ष राहणार श्याम नगर, लातूर.2) समीर जकियोदीन सय्यद, राहणार श्याम नगर, लातूर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस ठाणे गांधी चौक पोलिस करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक सोमय मुंडे,अपर पोलिस अधिक्षक डॅा अजय देवरे यांचे आदेशाने,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलिस अमलदार साहेबराव हाके , संजय कांबळे, मोहन सुरवसे, मनोज खोसे, राहुल कांबळे यांनी पार पाडली.


