मोबाईल चोरट्यांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,अनेक गुन्हे उघड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

मोबाईल चोरीचे गुन्हे करणाऱ्या टोळीला चोरीच्या 34 मोबाईल, किंमत 4 लाख 21 हजार रुपयाच्या मुद्देमालासह पाच आरोपींना अटक. वरिष्ठाचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…..

लातुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस ठाणे गांधीचौक हद्दी मधून मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे गांधी चौक गु.र.नं 606/2023 कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. तसेच इतर पोलिस स्टेशनला देखील मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सदरचे गुन्हे उघडकीस आणनेबाबत पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केले होते. त्यावरून पोलिस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करून त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या. सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना मोठ्या प्रमाणात बातमीदार नेमून तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेण्यात येत होते.
वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी केलेल्या परिश्रमामुळे पथकांना गुप्त बातमीदाराकडून मोबाईल चोरीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली.सदर माहितीचा बारकाईने अभ्यास व विश्लेषण करून मोबाईल चोरी करणारे व ते मोबाईल कमी किंमतीत लोकांना विकणाऱ्या आरोपींची टोळी निष्पन्न करून टोळी व  टोळीतील सदस्यांना त्यांच्या राहते ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे,सदर पथकांनी अतिशय कुशलतेने व उत्कृष्टपणे नमूद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन आरोपी नामे





1) आसिफ सत्तार सय्यद वय ,24 वर्ष,



2)जब्बार सत्तार सय्यद, वय 28 वर्ष,



3) बाबा सतार सय्यद, वय 21 वर्ष, सर्व राहणार लालबहादूर शास्त्री नगर लातूर.

4) मुस्तफा सतारमिया शेख, व 29 वर्ष, राहणार बरकत नगर लातूर सध्या राहणार करीमनगर, गरुड चौक लातूर.

5) मोहम्मद रिजवानुल हक अब्दुल रजाक गवंडी, वय 30 वर्ष, राहणार दत्तनगर निलंगा.

यासर्व आरोपींना दिनांक 14/12/2023 रोजी त्यांचे राहते ठिकाणाहून ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबुल केले.त्यांनी वर नमुद गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल विविध कंपनीचे 34 मोबाईल एकूण 4 लाख 21 हजार रुपयाचा मुद्देमाल हजर केल्याने वरील आरोपींना वर नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे विवेकानंद पोलिस ठाण्याचा मोबाईल चोरीचा एक गुन्हा उघड झाला असून मोबाईल चोरीचे अजुन काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे
गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस ठाणे गांधी चौक करीत आहेत.
वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलिस पथकांनी अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून मोबाईल चोरणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलिस अमलदार राहुल सोनकांबळे राजेश कंचे, मोहन सुरवसे, नितीन कठारे, राहुल कांबळे, मनोज खोसे प्रदीप चोपणे, सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीमती नलिनी गावडे पोलिस अंमलदार संतोष देवडे, शैलेश सुडे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!