दारव्हा घरफोडी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून छडा; दोन आरोपींना अटक, ₹४८,७०० चा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow
  • घटनेचे ठिकाण: जलाराम नगर, आर्णी रोड, दारव्हा (बंद घराचे कुलूप-कोयंडा तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी).

  • गुन्हा नोंद: पोलीस ठाणे दारव्हा



  • कारवाईची तारीख: १६ ऑगस्ट २०२६.

  • एकूण जप्त मुद्देमाल: ₹ ४८,७००/- किंमतीचा माल (सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल).



अटक करण्यात आलेले आरोपी: १. अतुल राजू चांदेकर (वय ३२ वर्ष, रा. आठवडी बाजार, यवतमाळ).

२. अविनाश अमन जोगळेकर (वय २६ वर्ष, रा. इंदिरा नगर, यवतमाळ).



जप्त केलेला मुद्देमाल:

  • सोन्याची अंगठी (अंदाजे २.५ ग्रॅम) – ₹ १७,५००/-



  • सोन्याचे कानातले/टॉप्स (अंदाजे ३.५ ग्रॅम) – ₹ २४,५००/-

  • घरफोडीतील रोख रक्कम – ₹ १,७००/-

  • रेडमी कंपनीचा मोरपंखी रंगाचा मोबाईल (एयरटेल सिमकार्डसह) – ₹ ५,०००/-

तपासातील माहिती: गुप्त माहितीच्या आधारे यवतमाळ येथील आठवडी बाजार परिसरातून संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींनी जलाराम नगर येथील घरफोडीची कबुली दिली. चोरीचा माल विकण्यासाठी ते मूर्तिजापूर (जि. अकोला) रेल्वे स्टेशनवर गेले होते, त्यानंतर यवतमाळ येथे माल विकण्यासाठी आले असता पोलिसांच्या जाळ्यात अडकले. या गुन्ह्यात त्यांचा आणखी एक साथीदार पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

कारवाई करणारे पथक: पोलीस अधीक्षक  कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक  अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखा पो.नि.  सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक शिवशंकर दिनकर कायंदे, पोलीस अंमलदार सोहेल मिर्झा, मिथुन जाधव, किशोर झेंडेकर, पवन ढवळे, अमित झेंडेकर आणि चालक अमित कुमरे, जितेंद्र चौधरी यांनी ही धडक कारवाई केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!