
भंडारा स्थागुशाने केले मोटारसायकल चोरी आणि घरफोडीचे गुन्हे उघड…
भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने केले मोटारसायकल चोरी आणि घरफोडीचे गुन्हे उघड…
भंडारा (प्रतिनिधी) – गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्ह्यात घरफोडी आणि मोटार सायकल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत होती. या मुळे कुठे तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण होत होता. म्हणून पोलिस अधीक्षक लोहित मतानी आणि अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. म्हणुन पोलिसांचे पथक हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या उद्देशाने गस्तीत होते, गस्तीत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, दारोड्याचे गुन्हे दाखल असलेले आरोपी साकोली पोलिस स्टेशन हद्दीत आहेत. अशी माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.


या बाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा चे पोहवा. सतिश देशमुख, संदीप मते, शैलेश बेदुरकर, बंडी मडावी, योगेश पेठे, आशीष तिवाडे, हे साकोली परीसरात पेट्रोलींग करीत असताना संशयीतरित्या फिरत असलेल्या दरोड्याचे गुन्हे दाखल असलेले दोन इसम नामे

(1) करण पंजाबराव बोकडे, (वय 27 वर्ष), रा. पंचशील वार्ड, शंकरपट जवळ साकोली, जि.भंडारा,

(2) सौरभ कमलकुमार सोनकुसरे, (वय 23 वर्ष), रा.सिव्हील वार्ड, शंकरपट जवळ साकोली, जि.भंडारा
यांना विश्वासात घेऊन त्यांच्या जवळ असलेल्या TVS APPACHE मोटर सायकल बाबत विचारपुस केली असता त्यांनी ती TVS APPACHE मोटर सायकल साथीदार नामे
(3) आनंद राजेश नागपुरे, (वय 26 वर्ष), रा.दांडेगाव, ता.तिरोडा, जि.गोंदीया
यांच्या सोबतीने सेंदुरवाफा येथील एका घरुन रात्र दरम्यान चोरल्याचे सांगीतले व त्याच रात्री मिळुन सेंदुरवाफा येथील एका दुकानाचे शटर फोडुन चोरी केल्याचे देखील कबुल केले. आरोपी नामे (1) करण पंजाबराव बोकडे, (वय 27 वर्ष), रा.पंचशील वार्ड, शंकरपट जवळ साकोली, जि.भंडारा, (2) सौरभ कमलकुमार सोनकुसरे, (वय 23 वर्ष), रा.सिव्हील वार्ड, शंकरपट जवळ साकोली, जि.भंडारा यांना पोलिस स्टेशन साकोली च्या ताब्यात पुढील कारवाई करीता देण्यात आले असुन त्यांचा तिसरा फरार साथीदार आरोपी नामे (3) आनंद राजेश नागपुरे, (वय 26 वर्ष), रा.दांडेगाव, ता.तिरोडा, जि.गोंदीया याचा शोध घेणे सुरु आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, सतिश देशमुख, संदीप मते, शैलेश बेदुरकर, बंडी मडावी, योगेश पेठे, आशीष तिवाडे यांनी अथक परिश्रम व कौशल्यपुर्ण तपास करुन भंडारा जिल्ह्यातील एकुण दोन गुन्ह्याची उकल केली.


