
गोडाऊन फोडून सूपारी चोरी प्रकरणात दोन चोरट्यांना अटक
गोडाऊन फोडून सूपारी चोरी प्रकरणात दोन चोरट्यांना अटक
धाराशिव (प्रतिनिधी) : शहरातील तांदूळवाडी रस्त्यावरील डिकसळ येथील सुपारीच्या गोडाऊनचे शटरचे कुलूप तोडून सुपारीच्या पोत्यांची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना पकडुन जवळपास 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले आहे. या प्रकरणी फिर्यादी महादेव घुले यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी नामे- महादेव मनोहरराव घुले, (वय 60 वर्षे), रा.दत्तनगर कळंब ता. कळंब, जि.धाराशिव यांचे तांदुळवाडी रोड लगत रुणवाल बिल्डींग डिकसळ ता.कळंब येथील सुपारीचे गोडाऊनचे शटरचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.01 डिसेंबर रोजी 05.00 ते दि.02 डिसेंबर रोजी 07:00 वा.सु. कुलूप तोडून आत प्रवेश करुन गोडाऊन मधील सुपारीचे 45 पोते एकुण 16,60,125 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे – महादेव घुले यांनी दि.02 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो.ठाणे येथे गुरनं 506/2023 कलम 454, 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला होता.

या गुन्हा तपासादरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, यांच्या आदेशावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहोळ, पोलीस हावलदार- औताडे, जानराव, फरहान पठाण, पोलीस नाईक/ जाधवर, पोलीस हावलदार समाधान वाघमारे, हुसेन सय्यद, चालक पोलीस अमंलदार भोसले यांचे पथक उप विभाग कळंब हद्दीतील मालाविषयक गुन्हे उघडकीस आणणेकामी पेट्रोलिंग करत असताना पोलीस पथक हे कळंब येथे आले असता पोलीस पथकास गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस ठाणे कळंब येथील गुरनं. 506/2023 कलम 454, 457, 380 भा.दं.वि.सं. हा कल्पनानगर, पारधी पिढी, कळंब ता.कळंब, जि.धाराशिव येथील – 1) शंकर मच्छिंद्र काळे, 2) श्रीकांत उर्फ बबलु बापु पवार व इतर यांनी केला असुन ते सध्या कल्पनानगर पारधीपिढी येथे लपून बसले आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरुन पोलीस पथकाने नमुद ठिकाणी जाऊन आरोपी नामे – 1) शंकर मच्छिंद्र काळे, 2) श्रीकांत उर्फ बबलु बापु पवार दोघे रा. कल्पानगर, पारधी पिढी, कळंब ता.कळंब जि.धाराशिव यांना आज दि.03 डिसेंबर रोजी कल्पना पारधी पिढीवरुन ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांनी नमुद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने नमुद आरोपी यांचे कडुन गुन्ह्यात चोरी गेलेल्या माला पैकी सुपारीचे 23 पोते, 6,95,175 ₹ व निळ्या रंगाचे सोनालिका ट्रॅक्टर हेड क्र.एमएच 13 BR 2587 असा एकुण 9,95,175 ₹ चा मुद्देमाल जप्त करुन आरोपी आणि मुद्देमाल पुढील कार्यवाही साठी कळंब पोलीस ठाण्यास दिला आहे.

अशा प्रकारे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, यांचे आदेशावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहोळ, पोलीस हावलदार- औताडे, जानराव, फरहान पठाण, पोलीस नाईक/ जाधवर, पोलीस हावलदार- समाधान वाघमारे, हुसेन सय्यद चालक- पोलीस अंमलदार भोसले यांच्या पथकाने केली आहे.


