पोलिस अधिक्षक लातुर श्री सोमय मुंडे हे सत्येंद्र कुमार दुबे पुरस्काराचे मानकरी…
लातुर – भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) कानपूरचा सत्येंद्र के दुबे स्मृती पुरस्कार सत्येंद्र के दुबे (BT/CE/1994) यांच्या स्मरणार्थ त्यांच्या अनुकरणीय जीवनासाठी आणि सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराशी लढताना सर्वोच्च बलिदानासाठी स्थापित करण्यात आला. हा पुरस्कार IIT च्या माजी विद्यार्थ्यांना दिला जातो. ज्यांनी मानवी मूल्यांचे पालन करण्यासाठी सर्वोच्च व्यावसायिक सचोटी दाखवून स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले आहे. IIT कानपूरच्या स्थापना दिनी (2 नोव्हेंबर) हा पुरस्कार दिला जातो. यावेळी IIT कानपूरने या पुरस्कारासाठी लातूर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांची निवड केली आहे. सोमय मुंडे हे IIT मुंबईचे विद्यार्थी होते .अभियंता सत्येंद्र कुमार दुबे यांचा खून त्यांच्या प्रामाणिकपणामुळे झाला. सत्येंद्र दुबे हे आयआयटी कानपूरचे विद्यार्थी होते .
भारतीय तंत्रज्ञान कानपूर ची स्थापना 1959 साली झाली. भारतीय तंत्रज्ञान संस्था, ग्रॅंड ट्रंक रोडवर, कल्याणपूर जवळ स्थित आहे. 1963 साली भारतात संगणक विज्ञानाचे प्रशिक्षण देण्यास सर्वप्रथम भारतीय तंत्रज्ञान संस्था,कानपूरने सुरुवात केली.
IIT कानपूरने यावर्षी 2023 च्या पुरस्कारासाठी लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची निवड केली आहे. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे हे त्याच्या प्रामाणिक, कुशाग्र आणि धाडसी प्रतिमेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांना गडचिरोलीतील मर्दिनटोला छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या घनदाट जंगलाच्या परिसरात 13 नोव्हेंबर 2021 ला आपल्या तुकडीच्या जवानांसोबत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यांच्या या पराक्रमाची दखल घेत भारत सरकारद्वारे दिला जाणारा पोलिस दलातील अत्यंत मानाचा समजला जाणारा शौर्य पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले होते.