
राजापेठ पोलिसांची मोठी कारवाई: १६ दुचाकी अन् ४.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त; ३ आरोपींना अटक
अमरावती येथील राजापेठ पोलिसांनी सराईत वाहन चोरांच्या मुसक्या आवळत १६ दुचाकी गाड्यांसह एकूण ४,५८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
कारवाईचा सविस्तर तपशील:

-
गुन्ह्याची पार्श्वभूमी: तक्रारदार सचिन बाळकृष्ण वैद्य (वय ४०, रा. भातकुली) यांची ७०,००० रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर प्लस गाडी (MH 27 EE 7370) राजापेठ बस स्थानक परिसरातून चोरीला गेली होती. याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
-
तपास व कारवाई: वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे आणि डीबी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे तपास करून या चोरीचा उलगडा केला.

अटक करण्यात आलेले आरोपी: १) वसीम खान बब्बु खान (वय ४० वर्षे, रा. हैदरपुरा, अमरावती)
२) शेख इरफान उर्फ भुऱ्या शेख मंसूर (वय ३६ वर्षे, रा. सादिया नगर, हैदरपुरा, अमरावती)

३) सद्दाम अली फैयाज अली (वय ३५ वर्षे, रा. बिस्मिल्ला नगर, लालखडी रोड, अमरावती)
जप्त केलेला मुद्देमाल (१६ वाहने व साहित्य): पोलीस कारवाईत हिरो स्प्लेंडर, पॅशन, होंडा युनिकॉन, होंडा ॲक्टिव्हा, टीव्हीएस स्कुटी, बजाज डिस्कव्हर यांसारख्या विविध कंपन्यांच्या १२ दुचाकी गाड्या आणि राजापेठ पोलीस ठाण्यातील वेगवेगळ्या गुन्ह्यांशी संबंधित चोरी झालेल्या वाहनांचे सुटे भाग (पार्ट्स) जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे व सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.




