चंद्रपूर एलसीबीची मोठी कारवाई: १.४५ लाखांचा ‘एमडी’ ड्रग्ज साठा जप्त!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

चंद्रपुरात १.४४ लाखांच्या ‘एमडी’ ड्रग्जसह तस्कर गजाआड; स्थानिक गुन्हा शाखेची मोठी कारवाई

चंद्रपूर (२९ जुलै २०२६):

चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हा शाखेने (LCB) धडक कारवाई करत अवैधपणे ‘एमडी’ (मेफेड्रॉन) ड्रग्जची विक्री करणाऱ्या एका सराईत तस्कराला रंगेहात अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १८.९५ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि मोबाईल फोनसह एकूण १,४४,७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.



नेमकी काय घडली घटना?

दिनांक २८ जुलै २०२६ रोजी रात्रीच्या वेळी स्थानिक गुन्हा शाखेचे पथक रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली. ललित उर्फ आर्यन बादल कंजर (वय ३८ वर्षे, रा. कंजर मोहल्ला, जलनगर वॉर्ड, चंद्रपूर) हा संशयित आरोपी त्याच्या जुन्या घरी विक्रीच्या उद्देशाने ‘एमडी’ ड्रग्ज पावडर आणून ठेवल्याचे निष्पन्न झाले.

माहितीची खातरजमा झाल्यानंतर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ विशेष पथक तयार करण्यात आले. एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यातील तरतुदीनुसार पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्याकडून रीतसर परवानगी घेऊन पंचांसमक्ष, फोटोग्राफर व शासकीय वजन काटेवाल्यासह आरोपीच्या घरावर छापा टाकण्यात आला.



जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:

  • एमडी (Mephedrone) ड्रग्ज पावडर: १८.९५ ग्रॅम (बाजारभाव किंमत रु. ९४,७५०/-)

  • मोबाईल: ओप्पो रेनो १५ ५जी (किंमत रु. ५०,०००/-)



  • एकूण जप्त मुद्देमाल: रु. १,४४,७५०/- (एक लाख चव्वेचालीस हजार सातशे पन्नास रुपये)

एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल

जप्त केलेला मुद्देमाल व अटकेतील आरोपी ललित उर्फ आर्यन कंजर याच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात ‘गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५’ (NDPS Act) च्या कलम ८(क), २२(ब) आणि २९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील कायदेशीर तपासासाठी आरोपीला रामनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.



कारवाई करणारे पोलीस पथक

ही कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक  आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या पथकात प्रामुख्याने:

  • पोलीस निरीक्षक: अमोल काचोरे

  • सहायक पोलीस निरीक्षक: योगेश हिवसे, दीपक कांकडवार

  • पोलीस उपनिरीक्षक: विनोद भुरले, सुनील गौरकर

  • अंमलदार व पथक: सर्वेश बेलसरे, पो.हवा. सतीश, पो.हवा. इम्रान, पो.हवा. लालू, पो.हवा. संदीप, पो.हवा. हिरालाल, तसेच पोलीस अंमलदार किशोर, शशांक आणि महिला पोलीस अंमलदार छाया यांनी या धडक कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!