गडचिरोलीत पोलिसांची मोठी कारवाई: २३ लाखांच्या अवैध दारूसह २ वाहने जप्त, ३ दारूतस्कर अटकेत!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गडचिरोली:

गडचिरोली जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी असतानाही छुप्या मार्गाने चालणाऱ्या अवैध दारू विक्री व वाहतुकीवर गडचिरोली पोलिसांनी पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला आहे. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या अवैध दारू विक्री व वाहतुकीविरुद्ध दिलेल्या कडक आदेशांनुसार स्थानिक गुन्हे शाखा (LCB), पोलीस स्टेशन गडचिरोली आणि पोलीस स्टेशन आष्टी यांनी ३० जुलै आणि ३१ जुलै २०२६ रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून ₹२२,९९,४००/- किमतीची अवैध देशी-विदेशी दारू आणि २ वाहने जप्त केली आहेत.



कारवाई १: गडचिरोली-आरमोरी रस्त्यावर बलेनो कारमधून ₹७.६ लाखांचा साठा जप्त

३० जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनिय माहिती मिळाली की, गोकुळनगर येथील इसम प्रमोद भोयर हा आपल्या साथीदारासह पांढऱ्या रंगाच्या सुझुकी बलेनो कारने आरमोरीकडून गडचिरोलीच्या दिशेने अवैध दारू घेऊन येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखा व गडचिरोली पोलिसांच्या पथकाने आरमोरी रस्त्यावर तात्पुरती नाकाबंदी केली. संशयित बलेनो कार (MH 33 AD 3192) येताना दिसताच तिला थांबवून चौकशी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारू मिळून आली.



  • अटक/गुन्हा दाखल आरोपी:

    1. प्रमोद दिलीप भोयर (वय ३३ वर्षे, रा. गोकुळनगर, ता. जि. गडचिरोली)



    2. मुकेश प्रकाश बोधलकर (वय ३८ वर्षे, रा. गोकुळनगर, ता. जि. गडचिरोली)

  • जप्त मुद्देमाल (एकूण ₹७,६०,८००/-):



    • रॉयल स्टॅग (२ लिटर मापाचे ३० नग) – ₹१,२०,०००/-

    • रॉकेट देशी दारू संत्रा (९० मि.ली. च्या निपा, १४ बॉक्स) – ₹१,१२,०००/-

    • सह्याद्री गोल्ड प्रीमियम व्हिस्की (१८० मि.ली. च्या ४८ निपा) – ₹१४,४००/-

    • ऑल सिझन्स डबल कॅश व्हिस्की (१८० मि.ली. च्या ४८ निपा) – ₹१४,४००/-

    • वापरती सुझुकी बलेनो कार (MH 33 AD 3192) – ₹५,००,०००/-

पोलीस कारवाई: पोस्टे गडचिरोली येथे अप क्र. १०३८/२०२६ (कलम ६५ (अ), ९८, ८३ म.दा.का.) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. दीपक दादाराव मोहिते करत आहेत.

कारवाई २: येणापूर येथे बोलेरो पिकअपमधून ₹१५.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

३१ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, चंद्रपूर येथील अब्दुल फरहान शेख हा महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनातून आष्टी हद्दीत अवैध दारूची वाहतूक करणार आहे.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व आष्टी पोलिसांनी मौजे येणापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील स्मारकाजवळ नाकाबंदी केली. संशयित महिंद्रा बोलेरो पिकअप (MH 34 BZ 7617) येताच थांबवून तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळला.

  • अटक आरोपी:

    1. अब्दुल फरहान शेख (वय २४ वर्षे, रा. जलनगर, ता. जि. चंद्रपूर)

  • जप्त मुद्देमाल (एकूण ₹१५,३८,६००/-):

    • देशी दारू (९० मि.ली. च्या ३,००० निपा) – ₹२,४०,०००/-

    • रॉयल स्टॅग (२ लिटर मापाचे ९६ नग) – ₹३,८४,०००/-

    • इम्पेरिअल ब्ल्यू (२ लिटर मापाचे ३० नग) – ₹१,०५,०००/-

    • हायवर्ड्स ५००० (५०० मि.ली. चे ९६० नग) – ₹२,८८,०००/-

    • बडवायझर मॅग्नम (५०० मि.ली. चे ७२ नग) – ₹२१,६००/-

    • वापरती महिंद्रा बोलेरो पिकअप (MH 34 BZ 7617) – ₹५,००,०००/-

पोलीस कारवाई: पोस्टे आष्टी येथे अप क्र. ०२२६/२०२६ (कलम ६५ (अ), ९८ म.दा.का.) अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउपनि. काशिनाथ शेडमाके करत आहेत.

मुद्देमालाचा संक्षिप्त तपशील

कारवाईचे ठिकाण जप्त वाहन दारूची किंमत वाहनाची किंमत एकूण जप्त मुद्देमाल
गडचिरोली (आरमोरी रस्ता) सुझुकी बलेनो (MH 33 AD 3192) ₹२,६०,८००/- ₹५,००,०००/- ₹७,६०,८००/-
आष्टी (येणापूर चौक) महिंद्रा बोलेरो पिकअप (MH 34 BZ 7617) ₹१०,३८,६००/- ₹५,००,०००/- ₹१५,३८,६००/-
एकूण बेरीज ०२ चारचाकी वाहने ₹१२,९९,४००/- ₹१०,००,०००/- ₹२२,९९,४००/-

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व कारवाई पथक

ही दोन्ही यशस्वी ऑपरेशन्स गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक  एम. रमेश यांच्या आदेशान्वये आणि खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:

  • मार्गदर्शक अधिकारी:

    •  कार्तिक मधीरा (अपर पोलीस अधीक्षक – अभियान)

    • गोकुल राज जी. (अपर पोलीस अधीक्षक – प्रशासन)

    •  अनिकेत हिरडे (सहाय्यक पोलीस अधीक्षक, गडचिरोली)

  • सहभागी पोलीस पथक:

    • पोनि.अरुण फेगडे (प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली)

    • सपोनि. भगतसिंग दुलत (स्थानिक गुन्हे शाखा)

    • पोनि. विनोद चव्हाण (प्रभारी अधिकारी, पोस्टे गडचिरोली)

    • पोनि.  विशाल काळे (प्रभारी अधिकारी, पोस्टे आष्टी)

    • पोउपनि. काशिनाथ शेडमाके

    • अंमलदार: पोहवा. सुधाकर दंडिकेवार, पोअं. रोहित गोंगले, चापोशी. दीपक लोणारे







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!