
मिरा-भाईदर पोलिस आयुक्तालयाच्या जवळ बेवारस बॅग सापडल्याने गोंधळ..
मिरा-भाईंदर वसई- विरार — गणपती विसर्जनाच्या धामधुमीत मीरा भाईंदर, वसई विरार पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर बेवारस बॅग आढळून आली आहे. काशिमीराच्या रामनगर संकुलात रस्त्याच्या कडेला एक बेवारस बॅग सापडली आहे.या बॅगेबाबत माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या बॅगवर वाळूने भरलेली गोणी ठेवली. बॅगभोवती चारही बाजूंनी वाळूने भरलेली गोणी टाकून संपूर्ण कॉम्प्लेक्स रिकामा करण्यात आला आहे. रस्त्याच्या कडेला पडलेल्या बेवारस बॅगमध्ये काय आहे, हे शोधण्यासाठी लवकरच बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात येणार आहे.
गणपती बाप्पांचं विसर्जन वाजत गाजत सुरू आहे, त्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर गर्दी केली आहे. त्यातच बेवारस बॅगच्या संशयामुळे पोलिसांच्या कामाचा ताण वाढला आहे. पोलिसांनीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महाराष्ट्रभर मोठ्या
प्रमाणावर सुरक्षा तैनात केली आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावं, तसंच कोणताही अनुचित प्रकार किंवा संशयास्पद वस्तू दिसली तर लगेचच पोलिस यंत्रणांना संपर्क करा, असं आवाहनही पोलीस करत आहेत.


